Video : ‘पक्ष फोडून सत्ता मिळत असेल, तर अशा सत्तेला मी चिमट्यानेही स्पर्श करणार नाही’

Eknath Shinde Latest News : एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडाळीने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय.

Video : 'पक्ष फोडून सत्ता मिळत असेल, तर अशा सत्तेला मी चिमट्यानेही स्पर्श करणार नाही'
अटल बिहारी वाजपेयीImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 7:41 AM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Political Crisis) पुन्हा भूकंप झालाय. एकनाथ शिंदेंनी बंड केलं. अख्खी शिवसेना फोडली. त्यानंतर उभी फूट शिवसेनेत (Shiv sena in Trouble) पडलीये. या सगळ्या घडामोडींमध्ये राजकीय घडामोडींनी वेग आला आहे. तर दुसरीकडे अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेलं एक विधानही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पक्षा तोडून नवा गट बनवून सत्ता हातात येत असेल, तर मी अशा सत्तेला चिमट्यानंही स्पर्श करणार नाही, असं विधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केलं होतं. आजच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अटलजींचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडाळीने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय. यामुळे महाराष्ट्र सरकारवरच संकटाचे ढग दाटलेत. महाविकास आघाडीसमोर आता सरकार (MVA Government) वाचवण्याचा पेच आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी दिलेलं आव्हान पाहता, उद्धव ठाकरेंसमोर पक्ष वाचवण्याचाही पेच असल्याचं बोललं जातंय.

पाहा व्हिडीओ : काय म्हणाले होते अटल बिहारी वाजपेई

उम्दा पंक्तिया या ट्वीटर अकाऊंटवरुन अटल बिहारी वाजपेयी यांचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ रिट्वीट करत सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करण्याचा प्रयत्न केलाय.

नेमकं काय घडलं?

शिवसेनेत नाराज आणि अस्वस्थ असलेल्या एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना मोठा धक्का दिला. अनेक आमदारांना घेऊन ते सूरतला गेले. तिथून त्यानी आसामला कूच केलं. आपल्या 40 हून अधिक आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलाय. महाविकास आघाडीतून बाहेर पडा, असा थेट संदेश त्यांनी आपल्या ट्वीटमधूनही दिलाय. तसंच पुन्हा आपणंच पक्षाचे गटनेते असल्याचाही दावा करत खळबळ उडवून दिलीय.

दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री निवासस्थान असलेला वर्षा बंगला बुधवारी सोडला होता. ते पुन्हा मातोश्रीवर परतले. सध्याची आकडेवारी पाहता एकनाथ शिंदेंनी संख्याबळ असल्याचा दावा केला आहे. मात्र त्यांच्याकडे 34 आमदारांच्या सह्या असल्याचं पत्रही समोर आलंय. तर आपणच खरी शिवसेना आहोत, हे सिद्ध करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना 37 शिवसेना आमदारांची गरज लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. तसं झालं तरिही त्याचा फटका सरकार बसणार आहे. दोन्ही बाजूने महाविकास आघाडी सरकार कचाट्यात सापडल्यानं महाराष्ट्रात मोठा राजकीय पेच निर्माण झालाय.

वाचा लाईव्ह अपडेट्स :

Eknath Shinde News, Uddhav Thackeray LIVE : एकनाथ शिंदेंच्या गटातली आमदारांची संख्या वाढणार, 3 आमदार गुवाहाटीत येणार असल्याची सूत्रांची माहिती

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.