गाडी फुल व्हायच्या आधी या, नंतर लटकत यावे लागेल, पक्षप्रवेशावरुन प्रवीण दरेकरांची मिश्किल टिपणी

अस्वस्थ शिवसैनिकाला आम्ही आधार दिला आहे आणि भाजपमध्ये प्रवेश दिला आहे. महाविकास आघाडी एकत्र असून एकमेकांवर टीका करत आहे. भारतीय जनता पार्टीची भीती या तिघांना आहे, असंही प्रवीण दरेकर म्हणाले.

गाडी फुल व्हायच्या आधी या, नंतर लटकत यावे लागेल, पक्षप्रवेशावरुन प्रवीण दरेकरांची मिश्किल टिपणी
विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 6:39 AM

ठाणे : शिवसेना ही पहिल्यासारखी राहिली नाही. शिवसेनेचे शक्तीस्थान हे तळागाळातील लोक आहेत. शाखा प्रमुख ही शिवसेनेची ताकद आहे, मात्र आज तेच शिवसैनिक नाराज असून भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. मी भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये असताना साधे नगरसेवकाचे तिकीट मिळाले नाही. परंतु भाजपने मला पक्षात घेऊन विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते पद दिले. त्यामुळे गाडी फुल व्हायच्या आधी या, नंतर लटकत यावे लागेल, अशी मिश्किल टिपणी प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केले. महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री-ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे एकमेकांवर टीका करतात. पण ते पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाहीत. तसेच मालमत्ता करमाफीचे गाजर दाखवले जात आहे, असेही दरेकर म्हणाले. मराठी माणसाला शिवसेनेने वाऱ्यावर सोडले असून त्यांची काळजी शिवसेनेला राहिली नाही. त्यामुळे मराठी माणसाला भाजपशिवाय पर्याय नाही, असेही प्रवीण दरेकर म्हणाले. वर्तकनगर येथील भीमनगर भागात भाजप पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले प्रवीण दरेकर?

छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेला याचा फरक पडणार आहे. अस्वस्थ शिवसैनिकाला आम्ही आधार दिला आहे आणि भाजपमध्ये प्रवेश दिला आहे. महाविकास आघाडी एकत्र असून एकमेकांवर टीका करत आहे. भारतीय जनता पार्टीची भीती या तिघांना आहे, त्याची जाणीव महाविकास आघाडीला आहे. चिकटलेले मुंगळे आहेत हे. गेली अडीच वर्ष महाराष्ट्रामध्ये पर्यटनाबाबत काय केले, कोकणात काय केले, कृती करून दाखवावी. तसेच सरकारला मराठा आणि OBC समाजाला आरक्षण द्यायचे नाही. माझ्या अपघात प्रकरणी तक्रार केली आहे, त्याबाबत पोलीस लक्ष देतील. एसटी कर्मचाऱ्यांबाबत हे सरकर बेफिकीर आहे, त्यांना संवेदना दिसत नाही, अशी टीकाही प्रवीण दरेकर यांनी केली.

पाहा व्हिडीओ :

वैशाली माडेच्या पाठिशी, चित्रा वाघ यांची ग्वाही

दरम्यान, ही शिवराळ भाषा घराघरापर्यंत जाते, यावर का कारवाई होत नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असं भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्राला आणि कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत उत्तर देत नाहीत. विषयाला कलाटणी देण्याचे काम हे महाविकास आघाडी सरकार करत आहे. तसेच गायिका वैशाली माडे यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे, आम्ही तिच्यासोबत आहोत. तसेच या संदर्भात त्रास देणाऱ्या व्यक्तीबाबत आम्ही पोलिसांशी बोलणे केले आहे. हिजाब प्रकरणाला वेगळे वळण दिले जात आहे. शाळेमध्ये असणारा युनिफॉर्म, मात्र बाहेर काहीही घालू शकतात, त्याबाबत प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे, मात्र यामध्ये विद्यार्थ्यांना भरडले जात आहे, असंही चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.

संबंधित बातम्या :

मिसळीवर ताव मारल्यानंतर रोहित पवारांच्या पुरणपोळ्यांवरुन फडणवीसांना, तर बिलावरुन भाजप नेत्यांना जोरदार टोला!

गुलाबराव तुमच्या नावाचं पहिलं अक्षरच खराब, बाळ, वारसं दुसऱ्याचं आणि डफडं तुमचं-खडसे

केंद्राकडून सूडनाट्य मात्र क्रियेला प्रतिक्रियेची मर्यादा पाळा, जयंत पाटलांचा नेत्यांना खोचक सल्ला

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.