Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde: ठरलं, दुपारपर्यंत सर्व बंडखोर आमदार गुवाहटी सोडणार, पण नेमकं थांबणार कुठे?

उद्या सकाळी अकरा वाजता ठाकरे सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे गोव्याहून सकाळी हे सर्व आमदार मुंबई विमानतळावर येतील आणि तेथून थेट विधानभवनात दाखल होतील, अशी शक्यता आहे.

Eknath Shinde: ठरलं, दुपारपर्यंत सर्व बंडखोर आमदार गुवाहटी सोडणार, पण नेमकं थांबणार कुठे?
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 10:29 AM

मुंबईः मागील आठ दिवसांपासून गुवाहटीत ठाण मांडून बसलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या आमदारांनी आज दुपारपर्यंत गुवाहटी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या गोष्टीसाठी बंडखोरीचं एवढं महानाट्य घडवून आणलं, ती सत्तास्थापनेची वेळ जवळ आली आहे. उद्या म्हणजेच गुरुवारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला राज्यपालांनी बहुमत चाचणीस सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. आघाडी सरकारचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचेच (Shivsena) मोठ्या प्रमाणावर आमदार फुटलेले असल्याने या बंडखोरीचा फटका ठाकरे सरकारला बसणार हे नक्की. मात्र एवढे दिवस गुवाहटीत थांबलेल्या शिंदे गटाच्या आमदारांनाही आजच गुवाहटी सोडावं लागणार आहे. उद्या बहुमत चाचणीच्या वेळी त्यांना विधानभवनात उपस्थित राहवं लागणार आहे. त्यामुळे आज दुपारीच गुवाहटी सोडल्यानंतर सर्व आमदार कुठे राहणार, यासंबंधी तर्क काढले जात आहेत.

आमदार कुठे राहणार?

गुवाहटीतून दुपारी निघाल्यानंतर सर्व आमदार आज संध्याकाळपर्यंत गोव्यात जाणार असल्याची माहिती सू्त्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी बंडखोर आमदारांना दिलेल्या धमक्यांमुले थेट महाराष्ट्रात- मुंबईत येणं सुरक्षित नसल्याचं आमदारांचं म्हणणं आहे. तसेच मुंबईत आलेल्या आमदारांची रात्रीतून पळवापळवी होऊ शकते, या भीतीनेही आमदारांना गोव्यात ठेवण्यात येईल, अशी माहिती पुढे आली आहे. उद्या सकाळी अकरा वाजता ठाकरे सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे गोव्याहून सकाळी हे सर्व आमदार मुंबई विमानतळावर येतील आणि तेथून थेट विधानभवनात दाखल होतील, अशी शक्यता आहे.

दिल्लीतून फडणवीस मुंबईत, रात्री राजभवनात

काल दुपारी देवेंद्र फडणवीस दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी गेले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर रात्री ते मुंबईत परतल्यानंतर सागर बंगल्यावर राज्यातील भाजप नेत्यांशी चर्चा झाली. त्यानंतर सर्व नेते रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास राजभवनावर गेले. यावेळी गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. शिवसेनेचे 39 आमदार काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ते राहू इच्छित नाहीत, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. परिणामी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली. त्यानुसार आज राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी म्हणजेच उद्या 30 जुलै रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य विधानसभासत्तेचं गणित
विधानसभेचे एकूण सदस्य288
दिवंगत सदस्य01
कारगृहात सदस्य02
सध्याची सदस्य संख्या285
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार39
आता सभागृहाची सदस्य संख्या285
बहुमताचा आकडा143
भाजपचं संख्याबळभाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172
मविआचं संख्याबळशिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ?भाजप (106)+ अपक्ष (27) = 133
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.