AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra politics : जळगावचा पॉवरफुल्ल नेता कोण? गुलाबराव पाटील, महाजन पालकमंत्री पदावर अडले; फडणवीसांची महाजनांसाठी फिल्डिंग

गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन या दोघांनीही जळगावच्या पालकमंत्रीपदाची मागणी केल्याने, पालकमंत्रीपद नेमके द्यायचे कोणाला असा प्रश्न नव्या सरकारसमोर निर्माण झाला आहे.

Maharashtra politics : जळगावचा पॉवरफुल्ल नेता कोण? गुलाबराव पाटील, महाजन पालकमंत्री पदावर अडले; फडणवीसांची महाजनांसाठी फिल्डिंग
| Updated on: Jul 04, 2022 | 7:52 AM
Share

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील राजकारणात चांगलीच उलथापाल पहायला मिळाली. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा दिला. नव्या सरकारची सत्ता देखील स्थापन झाली. बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सर्व सुरळीत झाले आहे असे वाटत असतानाच आता नव्या सरकारसमोर आणखी एक पेच निर्माण झाला आहे. तो म्हणजे शिंदे गटातील नेते तसेच भाजपाचे (BJP) नेते देखील पालकमंत्री पदासाठी अडून बसले आहेत. यात सर्वात आघाडीवर आहेत ते म्हणजे शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील आणि भाजपाचे गिरीश महाजन. दोघांनीही जळगावच्या पालकमंत्रीपदाची मागणी केल्याने फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासमोर जळगावचे पालकमंत्रीपद नेमके कोणाला द्यायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दोघांनाही व्हायचय जळगावचा पालकमंत्री

महाविकास आघाडीमध्ये असताना गुलाबराव पाटील यांच्याकडे मंत्रीपद होते. तसेच ते जळगावचे पालकमंत्री देखील होते. पुन्हा एकदा मंत्रीपदाची माळ गुलाबराव पाटलांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच त्यांनी जळगावच्या पालकमंत्रीपदाची देखील शिंदेंकडे मागणी केली आहे. दुसरीकडे गिरीश महाजन यांना देखील भाजपकडून मंत्रीपद देण्यात येणार आहे. त्यांनी देखील पालकमंत्रीपदाची मागणी केली आहे. दोघेही पालकमंत्रीपदावर आडून बसल्याने हा पेच कसा सोडवायचा असा प्रश्न एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर निर्माण झाला आहे. जुने पालकमंत्रीपद जसेच्यातसे ठेवण्याच्या प्रस्तावावर भाजपाने आक्षेप घेतल्यामुळे पालकमंत्रीपदे बदलण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

जळगावचा पॉवरफुल्ल नेता कोण?

जळगावचा पॉवरफुल्ल नेता कोण या इगोतून दोघांनाही जळगावचेच पालकमंत्री व्हायचे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. जर मला जळगावचे पालकमंत्रीपद मिळाले नाही तर मला मंत्रीपद नको अशी भूमिका गुलाबराव पाटील यांनी घेतली आहे. तर दुसरीकडे गिरीश महाजन यांची देखील अशीच भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाजनांसाठी फिल्डिंग लावल्याचे समोर येत आहे. हवे तर दोन पालकमंत्रीपद घ्या, मात्र जळगावचे पालकमंत्रीपद सोडा असा प्रस्ताव फडणवीस यांनी शिंदेसमोर मांडला आहे. एकनाथ शिंदेंकडून गुलाबराव पाटलांची मनधरणी सुरू आहे. मात्र आपल्याला फौजदावरून हवालदार होणे मान्य नसल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितल्याची माहिती समोर येत आहे. आता जळगावचे नवे पालकमंत्री नेमके कोण होणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.