Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : ‘पुन्हा राहशील का उभा? नाही रे भाऊ नाही रे भाऊ’

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : अनिल बोंडे, धनंजय महाडिक आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर हे भाजपच्या विजयनानं भारावले होते. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मिठी मारली.

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : 'पुन्हा राहशील का उभा? नाही रे भाऊ नाही रे भाऊ'
जोरदार घोषणाबाजी..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 9:01 AM

मुंबई : निवडणूक म्हटलं की हार-जीत आली. राज्यसभा निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळपासून जो माहौल तयार झाला होता, तर चक्क शुक्रवारी पहाटेपर्यंत तसाच होता. राज्यसभेची निवडणूक झाली. निकाल (Maharashtra Rajya Sabha Election Results 2022) लागला. रात्रभर मतमोजणी सुरु होती. या मतमोजणीनंतर अखेर राज्यसभेच्या प्रतिष्ठेच्या बनलेल्या निवडणुकीत भाजपने (BJP) महाविकास आघाडीवर मात केली. भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले. पहाटे लागलेल्या या निकालानंतर सगळ्यांनी भाजपच्या आमदारांनी एकच जल्लोष केला. विधान भवनाच्या (Vidhan Bhawan) पायऱ्यांवर भाजपचे आमदार आनंद साजरा करत होते. यावेळी महाविकास आघाडीला डिवचणारी घोषणाबाजीही करण्यात आली. तसंच यावेळी पुन्हा एकदा म्यॅव म्यॅवचे आवाजही काढण्यात आलेत. शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्यानंतर भाजपच्या आमदारांनी एकत्र येत विधान भवनाच्या पायऱ्यांवरुन विोधकांना डिवचलंय.

‘पुन्हा राहशील का उभा?’

निकाल लागल्यानं देवेंद्र फडणवीस विधान भवनाऱ्या पायऱ्यांवर येताच भाजप आमदारांनी विरोधकांनाविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. पुन्हा राहशील का उभा? नाही रे भाऊ नाही भाऊ, असं म्हणत शिवसेनेवर हल्लाबोल करण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचाही जयघोष भाजप आमदारांनी केला. तसंच म्यॅव म्यॅवचे आवाज काढून विधान भवनाच्या पायऱ्यांवरुन भाजप आमदारांनी निशाणा साधला. ये तो एक छाकी है.. 20 तारीख बाकी है, अशीही घोषणा यावेळी करण्यात आली. आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय, असं म्हणत जोरदार घोषणाबाजी यावेळी भाजपच्या आमदारांनी यावेळी केली.

विजयी मिठी…

यावेळी अनिल बोंडे, धनंजय महाडिक आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर हे भाजपच्या विजयनानं भारावले होते. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मिठी मारली. विजयाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी चंद्रकात पाटील आणि आशिष शेलार यांनी मिठी मारली. त्यानंतर आशिष शेलार यांनी देवेंद्र फडणवीस यांना मिठी मारली. मग प्रवीण दरेकर यांनी आशिष शेलार यांना मिठी मारली आणि भाजपला मिळालेल्या विजयाच्या शुभेच्छा दिल्यात. यादरम्यान, भाजपचे नेते भावूक झाल्याचंही पाहायला मिळालं. मात्र या सगळ्यात भाजपच्या घोषणा कुठेच थांबल्या नव्हत्या. यानंतर भाजपच्या नेत्यांनी एकमेकांनी पुश्चगुच्छ दिले आणि विजय साजरा केली. दिमाखात फोटोसेशनही यानंतर करण्यात आलं.

राज्यसभेचा महाराष्ट्राचा अंतिम निकाल

  1. भाजप – 3
  2. शिवसेना – 1
  3. काँग्रेस – 1
  4. राष्ट्रवादी काँग्रेस – 1

राज्यसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार जिंकला?

  1. प्रफुल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस- 43
  2. इम्रान प्रतापगढी, काँग्रेस – 44
  3. संजय राऊत, शिवसेना – 41
  4. पियुष गोयल, भाजप – 48
  5. अनिल बोंडे, भाजप – 48
  6. धनंजय महाडिक, भाजप – 41

राज्यसभेत मिळवलेल्या विजयानंतर आता भाजपचा विधानसपरिषदेसाठीचा आत्महविश्वास वाढलाय. राज्यसभेच्या निवडणुकांनंतर आता राज्यात विधानपरिषदेचे पडघम वाजायलाही सुरुवात झालीय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.