Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : आता बॅलन्स होणार की जाणार? महाडिकांच्या विजयानं कोल्हापूरची राजकीय समीकरणं बदलणार? एका स्टोरीचे 5 कॉर्नर समजून घ्या
आता मात्र बंटी पाटलांपुढे आणि इतर राजकीय पक्षांपुढे कोल्हापुरात महाडिकांच्या रुपाने तगडं आव्हाड तयार झालंय. त्यामुळे आगामी काळात कोल्हापुरात कोमजलेलं भाजपं कमळ फुलत जाणार की महाविकास आघाडी जोरदार कमबॅक करणार? याबाबत काही गोष्टी समजून घेऊया..
कोल्हापूर : आत्ताची राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election)ही नुसती राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी लागलेली निवडणूक नव्हती, तर राज्याच्या राजकारणाची समीकरणं बदलणारी ही निवडणूक होती. कोल्हापूरच्या राजकारणातली तर अनेक गणित धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या विजयानं बदलणार आहेत. गेल्या काही दिवसात कोल्हापुरात (Kolhapur Politics) महाविकास आघाडीचा विजयीरथ हा सुसाट सुटला होता. मात्र काल भाजपचने लावलेल्या या ब्रेकने आता स्थानिक राजकारणात पुन्हा भाजपची गाडी ही सुसाट सुटणार असंच काहीसं चित्र आहे. गेल्या काही वर्षा महाडिक कुटुंबाल एकापाठोपाठ एक पराभवाचे धक्के पचवावे लागले होते. तर दुसरीकडे बंटी पाटलांचा प्रत्येक डावपेच यशस्वी ठरताना दिसत होता. आता मात्र बंटी पाटलांपुढे आणि इतर राजकीय पक्षांपुढे कोल्हापुरात महाडिकांच्या रुपाने तगडं आव्हाड तयार झालंय. त्यामुळे आगामी काळात कोल्हापुरात कोमजलेलं भाजपं कमळ फुलत जाणार की महाविकास आघाडी जोरदार कमबॅक करणार? याबाबत काही गोष्टी समजून घेऊया..
1. पराभवाच्या मालिकेचा दी एन्ड
सुरूवातीला खासदारकीचा पराभाव त्यानंतर स्थानिक निवडणुकांतील पराभवांनी कोल्हापुरातील राजकारणात महाडिकांचा राजकीय दबदबा कमी झाला आहे की काय? असा सवाल उपस्थित होत होता. मात्र काल धनंजय महाडिक यांनी मैदान मारलं आणि कुटुंबात 8 वर्षानंतर पुन्हा गुलाल पहायला मिळाला. या राज्यसभा निवडणुकीच्या विजयाने सततच्या पराभवाचा वचपा काढला आहे.
2. बंटी विरुद्ध मुन्ना संघर्ष वाढणार
कोल्हापुरातल्या राजकारणात बंटी पाटील आणि मुन्ना महाडिक यांचं नाव कुणी ऐकलं नसले असं एखाद लहन पोरगही सापडणं कठीण आहे. सुरूवातीलपासून या दोन्ही घरण्यात राजकारणावरून जोरदार टशन राहिली आहे. गेल्या काही दिवसात बंटी पाटलांची लावलेली प्रत्येक फिल्डिंग ही महाडिकांच्या मनसुब्यावर पाणी फिरवत होती. मात्र आता या संघर्षाला आणकी धार येणार आहे.
3. विरोधकांची मोट बांधणार
महाडिक यांच्या विजयाच्या आगोदर कोल्हापुरातील भाजप नेत्यांमध्ये जो आत्मविश्वास दिसत नव्हता तो आता दिसून लागलाय. शिवाय महाडिक यांचा विजय खेचून आणल्याने चंद्रकांत पाटील यांच्यावर होणाऱ्या टीकेलाही सणसणीत उत्तर मिळालं आहे. त्यामुळे आता सतेज पाटील विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न मुन्ना यांच्याकडून केले जाणार हेही स्पष्टच आहे.
4. स्थानिक निवडणुकात कुणाचा वरचष्मा?
गेल्या काही दिवसात महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांत सतेज पाटलांचं पारडं जड ठरत होतं. मात्र भाजपची मोठी ताकद वाढणार आहे. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत महाडिक विरुद्ध पाटील असा जोरदार सामना रंगताना दिसून येणार आहे.
5. गोकुळात महाडिक कमबॅक करणार?
भाजपमुक्त झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात महाडिक यांच्या विजयाने भाजपला संजीवनी मिळाली आहे. धनंजय महाडिक यांच्या रूपाने भाजपला जिल्ह्यात पहिला खासदार मिळाला आहे, त्यामुळे आता गोकुळनंतर राजाराम कारखाना हाती घेण्याच्या बंटी पाटलांच्या मनसुब्याला महाडिकांकडून सुरूंग लावला गेला आहे. त्यामुळे येणारी गोकुळची निवडणूकही प्रतिष्ठेची होणार आहे.