Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022: प्रफुल्ल पटेलांना एक मत जास्तीचं पडलं पण ते कुठून आलं? पवारांनी त्याचा ठावठिकाणा सांगितला

Sharad Pawar : 'गंमत अशी आहे, की ते एक्स्ट्रा मत शिवसेनेला जाणारं नव्हतं'

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022: प्रफुल्ल पटेलांना एक मत जास्तीचं पडलं पण ते कुठून आलं? पवारांनी त्याचा ठावठिकाणा सांगितला
शरद पवारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 11:35 AM

पुणे : राज्यसभा निवडणुकीच्या निकालावर राष्ट्रवादी (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यसभेत भाजपचा तिसरा उमेदवार निवडून आला. या निकालाचा (Maharashtra Rajya Sabha Election Results 2022) धक्का लागला नाही, असं ते म्हणालेत. शिवाय भाजपचा तिसरा उमेदवार निवडून कसा आला? याची गंमतही पवारांनी सांगितली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुकही केलं. फडणवीसांनी चमत्कार केला, तो मान्य करावा लागले, अशा शब्दात पवारांनी फडणवीस यांची स्तुती केलीये. तसंच कोणत्याही राजकीय पक्षाची मतं फुटली नाही, असंही पवारांनी निवडणूक निकाल पाहिल्यानंतर स्पष्ट केलंय. मात्र यासोबत त्यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेल्या लढतीबाबतही महत्त्वपूर्ण टिप्पणी केली.

ती तर गंमत…

शरद पवार यांनी राज्यसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या कोणत्याच राजकीय पक्षांची मतं फुटली नाहीत. कोणत्यात राजकीय पक्षांच्या मताला धक्का बसलेला नाही. राहिला प्रश्न अपक्षांचा. तर अपक्षांच्या लॉटमध्ये गंमती झालेल्या आहेत. प्रफुल्ल पटेल यांना आलेल्या एक्स्ट्रा मत शिवसेनेला गेलं असतं, तर शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला नसता का? असा प्रश्न यावेळी शरद पवार यांनी उपस्थित करण्यात आला. त्यावेळी त्यांनी म्हटलं की…

गंमत अशी आहे, की ते एक्स्ट्रा मत शिवसेनेला जाणारं नव्हतं. ते एक्स्ट्रा मत आमच्या विरोधकांच्या कोट्यातलं होतं. ते राष्ट्रवादीला आलं आणि त्यानं मला सांगून दिलंय. तिथं अनेक असे लोकं आहेत, की कधीकाळी त्यांनी माझ्यासोबत काम केलेलंय. मी जर एखादा शब्द टाकला तर नाही म्हणायची त्यांची तयारी नसते, पण मी त्याच्यात पडलो नाही. पण एकाने स्वतःहून मला सांगितलं. भाजपचं मत फुटलेलं नाही. अपक्षाचं मत फुटलं. पण ते अपक्षाचं मत भाजपासोबत होतं. ते राष्ट्रवादीला पडलं.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उमेदवारासह शिवसेना आणि काँग्रेसच्याही एका उमेदवाराचा राज्यसभा निवडणुकीत विजय झाला. पण शिवसेनेनं सहाव्या जागेसाठी उभा केलेला उमेदवार मात्र पराभूत झाला. तर भाजपचे तीनही उमेदवार राज्यसभा निवडणुकीत विजयी झाले. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु होती. पहाटेच्या सुमारास अखेर हा बहुप्रतिक्षित निकाल जाहीर करण्यात आला.

राज्यसभेचा महाराष्ट्राचा अंतिम निकाल

  1. भाजप – 3
  2. शिवसेना – 1
  3. काँग्रेस – 1
  4. राष्ट्रवादी काँग्रेस – 1

कोण किती मतांनी विजयी?

  1. प्रफुल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस- 43
  2. इम्रान प्रतापगढी, काँग्रेस – 44
  3. संजय राऊत, शिवसेना – 41
  4. पियुष गोयल, भाजप – 48
  5. अनिल बोंडे, भाजप – 48
  6. धनंजय महाडिक, भाजप – 41
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.