AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, शिंदे गटाने फेटाळला….

चंद्रकांत पाटील यांच्या गौप्यस्फोटानंतर महाराष्ट्रातील सत्तांतर हे अडीच वर्षांचं प्लॅनिंग होतं, हे जास्त ठळकपणे दिसून आलं. पण केसरकरांनी हा दावा खोडून काढला.

सत्तांतरावर भाजपचा मोठा गौप्यस्फोट,  शिंदे गटाने फेटाळला....
Image Credit source: social media
| Updated on: Oct 07, 2022 | 1:31 PM
Share

मुंबईः महाराष्ट्रातलं सत्तांतर नेमकं कसं आलं. शिंदे समर्थक आमदारांची जमवाजमव कधीपासून सुरु होती, यावर भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुण्यातील कार्यक्रमात एक मोठा गौप्यस्फोट केला.  या वक्तव्यानं सत्तांतर नाट्यात भाजपची काय भूमिका होती, हे स्पष्ट होतंय. मात्र शिंदे गटाचे (Eknath shinde) नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य पूर्णपणे खोडून काढलंय.

चंद्रकांत पाटील पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, दोन-अडीच वर्ष काही घटना मनात होत्या. काही संदर्भ मनात होते. काहीतरी प्लॅनिंग होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांना विश्वास द्यायचा होता…. मध्य प्रदेशमध्ये आपलं सरकार आलं नाही, नंतर आलं. राजस्थानमध्ये 3 चाच फरक होता. कर्नाटकमध्ये आपलं सरकार आलं नाही, नंतर आलं. 2 चाच फरक होता. महाराष्ट्रात ४० चा फरक होता. एवढ्या जणांना बाहेर काढणं सोपं नव्हतं.

त्यामुळे महाराष्ट्रासाठी वेळ लागत होता. सगळ्यांना धरून ठेवण्याची आवश्यकता होती. शेवटी टायमिंग साधलं गेलं आणि सरकार आलं, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केलं.

शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांनी मात्र हा दावा खोडून काढला. आमचं असं काही प्लॅनिंग नव्हतं. आमचा उत्स्फूर्त उठाव होता. तो काही तत्त्वांसाठी होता. त्याबद्दल सविस्तर मी पत्रकार परिषदेत केला होता, असं वक्तव्य केसरकर यांनी केलंय.

30 जून रोजी आमदार घेऊन बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांना भाजपचं पाठबळ आहे, हे स्पष्ट होतं. मात्र आम्हीच हा उठाव केल्याचं वारंवार शिंदे गटाकडून सांगण्यात आलं.

आमच्या पाठिशी मोठी अदृश्य शक्ती असल्याचं एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी सांगितलं होतं. त्यानंतर शिंदे गटातील प्रत्येक आमदारांनी आपल्या भागावर, महाविकास आघाडीतर्फे कसा अन्याय झाला, हे सांगितलं. त्यामुळे हे बंड केल्याचं म्हटलं.

पाहा दोन्ही बांजूंच्या प्रतिक्रिया-

मात्र विविध प्रसंगांनुसार, याच नेत्यांनी तसेच भाजपच्याही काही नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमधून शिवसेनेतील या बंडामागे भाजपाच हात असल्याचं उघड होत गेलं.

चंद्रकांत पाटील यांच्या आजच्या गौप्यस्फोटानंतर अडीच वर्षांचं प्लॅनिंग होतं, हे जास्त ठळकपणे दिसून आलंय.

3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.