Maharashtra Vidhan Parishad Election 2022 LIVE : विधान परिषदेसाठी सर्वच पक्षांचा बैठकांचा सपाटा, उद्या मतदान

| Updated on: Jun 19, 2022 | 11:34 PM

Maharashtra Vidhan Parishad Election 2022 LIVE updates : राज्यातलं वातावरण सध्या विधान परिषद निवडणुकीने (Maharashtra Vidhan Parishad Election) ढवळून निघालं आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. उद्या विधान परिषदेच्या दहा जागांसाठी मतदान पार पडत आहे.

Maharashtra Vidhan Parishad Election 2022 LIVE : विधान परिषदेसाठी सर्वच पक्षांचा बैठकांचा सपाटा, उद्या मतदान
विधान परिषदेसाठी सर्वच पक्षांचा बैठकांचा सपाटाImage Credit source: tv9

मुंबई : राज्यातलं वातावरण सध्या विधान परिषद निवडणुकीने (Maharashtra Vidhan Parishad Election) ढवळून निघालं आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. उद्या विधान परिषदेच्या दहा जागांसाठी मतदान पार पडत आहे. भाजपकडून पाच उमेदवार मैदानात उतरवण्यात आले आहेत. तर महाविकास आघाडीकडून सहा उमेदवार मैदानात उतरवण्यात आले आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक रंगतदार झाली आहे. दोन्ही बाजुने विजयाचे दावे करण्यात येत आहेत. तर दोन्ही बाजुने अपक्षांचा पाठिंबा मिळवण्याकरिता पळापळही सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीत बसलेला फटका लक्षात घेता महाविकास आघाडी यावेळी जास्त सावध भूमिका दिसून येतेय. तसेच राज्यसभेतील पॅटर्न पुन्हा पाहायला मिळेल असा दावा आता भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. या निवडणुकीच्या सर्वात वेगवान अपडेट तुम्ही याठिकाणी पाहणार आहात…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Jun 2022 10:28 PM (IST)

    फडणवीसांच्या आमदारांना चुका न करण्याच्या सूचना

  • 19 Jun 2022 10:26 PM (IST)

    खासदार अरविंद सावंत फोस सिझनमध्ये दाखल

  • 19 Jun 2022 10:26 PM (IST)

    राष्ट्रवादी आणि शिवसेनेची अज्ञातस्थळी बैठक

  • 19 Jun 2022 09:40 PM (IST)

    भाजपच्या बैठकीत जोरदार घोषणाबाजी

  • 19 Jun 2022 09:39 PM (IST)

    भाजप आमदारांना ओळखपत्र सोबत ठेवण्याचे आदेश

  • 19 Jun 2022 09:39 PM (IST)

    सेनेकडील चार मतांसाठी काँग्रेस आग्रही

  • 19 Jun 2022 09:38 PM (IST)

    प्रसाद लाड यांना किती मतांची गरज?

  • 19 Jun 2022 09:37 PM (IST)

    विधानसभेत शिवसेनेकडे किती मतं?

  • 19 Jun 2022 08:52 PM (IST)

    राज्यमंत्री बच्चू कडू यांचा साधेपणा पुन्हा आला समोर

    राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुंबईतील पवईत टपरीवर बसून खाल्ले चहा बिस्किटे

    विधान परिषद निवडणुकीत आपापल्या आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी आमदारांची मुक्कामाची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये

    सर्वपक्षीय आमदार पंचतारांकित हॉटेल मध्ये असतांना आमदार व राज्यमंत्री बच्चू कडू मात्र बिनधास्तपणे मुंबईच्या पवई येथील एका चहाच्या टपरीवर जाऊन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अगदी सामान्यांसारखं बसून बच्चू कडू यांनी चहा बिस्कीटवर ताव मारला..

  • 19 Jun 2022 08:35 PM (IST)

    राष्ट्रवादीची बैठक सुरू

    आज बैठकीत अजीत पवार सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार…

    आज नरहरी झिरवळ यांचा वाढदिवस आहे

    या बैठकिनंतर तो साजरा करण्यात येणार

  • 19 Jun 2022 08:01 PM (IST)

    शामसुंदर शिंदे शिवसेनेवर नाराज, मात्र राष्ट्रवादीसोबत कायम…

  • 19 Jun 2022 07:54 PM (IST)

    MIM च्या आमदाराचं मत एकनाथ खडसे यांना

  • 19 Jun 2022 07:52 PM (IST)

    राष्ट्रवादीच्या आमदारांना पसंतीक्रम उद्या सांगणार

  • 19 Jun 2022 07:50 PM (IST)

    बहुजन विकास आघाडीची तीन मतं कुणाला?

  • 19 Jun 2022 07:49 PM (IST)

    भाजपला करारा जवाब मिळेल-बाळासाहेब थोरात

  • 19 Jun 2022 07:29 PM (IST)

    जयंत पाटील ट्रायडंन्ट हॉटेलला पोहचले

    काही वेळात अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित बैठक पार पडणार

    बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.

  • 19 Jun 2022 07:28 PM (IST)

    यावेळी भाजपकडे अतिरिक्त मतं नाहीत-अशोक चव्हाण

  • 19 Jun 2022 07:24 PM (IST)

    आमचे सर्व उमेदवार जिंकणार-बाळासाहेब थोरात

  • 19 Jun 2022 07:21 PM (IST)

    राग बाहेर काढण्यासाठी शिवसेना आमदारांना संधी

  • 19 Jun 2022 07:18 PM (IST)

    काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

    एकत्र पद्तीने आम्ही नियोजन करत आहोत.

    मित्र पक्ष देखील अमच्या सोबत आहेत.

    पसंतीक्रमांकाच्या मतांबाबत बैठकीत चर्चा झाली.

    त्यानुसार आम्ही मतदान करणार अहोत.

    महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील.

    जर बैठक मुख्यमंत्र्यांसोबत झाली तर ती नियोजनाबाबत होईल.

  • 19 Jun 2022 07:16 PM (IST)

    अपक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांची प्रतिक्रिया

    राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी ट्रायडंट हॉटेलमध्ये आलो आहे

    माझं मत राष्ट्रवादीलाच… मतावर ठाम…।।

    राज्यसभा निवडणुकीत संजय राऊत यांनी अविश्वास दाखवला होता

    मात्र आपण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आहे, शिवसेनेवर नाराजी अजून आहे

  • 19 Jun 2022 07:14 PM (IST)

    शिवसेना आणि अपक्ष आमदारासाठी आज पुन्हा मतदानाची रंगीत तालीम

    थोड्या वेळात हॉटेल वेस्टीन मध्ये होणार सुरवात

    राज्यसभा निवडणुकीत फटका बसल्यावर आता सेनेकडून घेतली जातेय काळजी

    आदित्य ठाकरे आणि संजय राऊत बैठकीसाठी दाखल.

    शिवसेनेच्या बैठकीला एकनाथ शिंदे पोहचले

  • 19 Jun 2022 07:14 PM (IST)

    हितेंद्र ठाकूर यांची प्रतिक्रिया

    मी माझ्या 30 वर्षाच्या कार्किर्दीत मतदानासाठी हॅाटेलमध्ये राहीलो नाही

    मी जे बोलतो ते करतो कारण तसे मी ठरवले तर सगळ्यांना फसवू शकलो आसतो

    पण मी फसवाफसवीचे राजकारण करत नाही

    क्षितीज ठाकूर मतदानाला येणार की नाही याची शाश्वती मी देऊ शकत नाही

    NOT FOR SALE आशी पाटी आम्ही लावलेली आहे

    घोडाबाजारच्या ऑफर येत नसतात, आशा ऑफर कोणी देत नसतो

    आम्ही फक्त मतदार संघातील कामाच्या आढाव्यावर चर्चा करत आसतो

    आमच्या मतदारसंघाच्या विकासाला जो मदत करेल त्याला आम्ही उद्या मतदान करू

  • 19 Jun 2022 07:10 PM (IST)

    आमच्या कुठल्याही आमदाराची नाराजी नाही-नाना पटोले

  • 19 Jun 2022 07:07 PM (IST)

    भाजप नेत्यांच्या आज दोन बैठका

  • 19 Jun 2022 07:06 PM (IST)

    मी राष्ट्रवादीसोबत आहे, महाविकास आघाडीसोबत नाही-श्यामसुंदर शिंदे

  • 19 Jun 2022 07:05 PM (IST)

    MIM ची मतं महाविकास आघाडीला

  • 19 Jun 2022 07:03 PM (IST)

    सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

    मुख्यमंत्र्यांचं विधान हे हास्यास्पद विधान आहे.

    या अगोदर दोन वेळा शिवसेना फुटली आहे

    एकदा छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात फुटली तर एकदा नारायण राणे यांच्या नेतृत्वात.

    भारतीय जनता पार्टीत असे कधीच झाले नाही त्यांचं भाष्य हे हास्यास्पद आहे.

    स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना फुटली स्वतःच्या कुटुंबातले सख्खे चुलत भाऊ फुटले त्यांनी नवीन स्थापन केला. असं वाक्य वापरण्याचा अधिकार त्यांना नाही आहे.

    कटकारस्थाने राज्य आणि राजकारण चालत नाही बरोबर आहे. कटकारस्थान करून शिवसेना 20 ऑक्टोंबर 2019 ला सत्ता घेऊ शकता. पण सत्यावर विजय प्राप्त करू शकत नाही.

  • 19 Jun 2022 07:03 PM (IST)

    एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पावसाला सुरुवात

    सामना सुरु होणार होता पण तितक्यात बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खेळाडू पुन्हा पॅव्लेयिनमध्ये गेले आहेत. सामना सुरु होण्याच्यावेळी पाऊस येईल असा अंदाज आधीच हवामान विभागाने वर्तवला होता.

  • 19 Jun 2022 07:00 PM (IST)

    रामदास आठवले यांची प्रतिक्रिया

    विधान परिषद निवडणुकीत भाजपचा पाचवा उमेदवार निवडून येणार अपक्ष आमदारही भाजपला मतदान करणार.

    ज्याप्रमाणे राज्यसभेची जागा निवडून आली त्याप्रमाणे ही जागा सुद्धा निवडून येणार

    राष्ट्रवादी काँग्रेस सोबत शिवसेना गेल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे.

    अनेक शिवसैनिकांना वाटते भाजप सोबत राहिले पाहिजे त्यामुळे कदाचित शिवसेनेची मते फुटण्याची शक्यता आहे.

  • 19 Jun 2022 06:56 PM (IST)

    ट्रायडेंटमध्ये कांग्रेस नेत्यांची अजित पवारांसोबतची बैठक संपली

    एक तास झाली बैठक

    कांग्रेस नेत्यांच्या चेहऱ्यावर तणाव…

    मुंक्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार कांग्रेस नेते

    मविआची महत्वाची बैठक…

Published On - Jun 19,2022 6:52 PM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.