Vidhan Parishad Election : निकालापूर्वीच काँग्रेसला झटका, मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्यावरील आक्षेप निवडणूक आयोगानं फेटाळला, पुढे काय?

टिळक आणि जगताप यांनी आपली मतपत्रिका स्वत: मतपेटीत न टाकता सहकाऱ्यांचा वापर केला. हा गोपनीय मतदानाचा भंग असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला. तशी तक्रार त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली. मात्र, आता राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसचा आक्षेप फेटाळला आहे.

Vidhan Parishad Election : निकालापूर्वीच काँग्रेसला झटका, मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्यावरील आक्षेप निवडणूक आयोगानं फेटाळला, पुढे काय?
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 5:52 PM

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) निकालापूर्वीच काँग्रेसला मोठा झटका बसलाय. कारण, काँग्रेसनं भाजपचे आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतावर आक्षेप घेतला होता. टिळक आणि जगताप यांनी आपली मतपत्रिका स्वत: मतपेटीत न टाकता सहकाऱ्यांचा वापर केला. हा गोपनीय मतदानाचा भंग असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला. तशी तक्रार त्यांनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) केली. मात्र, आता राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसचा आक्षेप फेटाळला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आपला निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवला आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा दिलासा तर निवडणूक निकालापूर्वीच काँग्रेसला मोठा झटका बसल्याचं पाहायला मिळत आहे.

आता चेंडू केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात

राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसचा आक्षेप फेटाळला आहे. तसं पत्र त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला मेलद्वारे पाठवलं आहे. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय देतं हे पाहावं लागणार आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर विधान परिषदेची मतमोजणी सुरु होईल, असं सांगण्यात येत आहे.

काँग्रेस राज्य निवडणूक आयोगाविरोधात कोर्टात जाणार

काँग्रेसनं मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर आक्षेप घेतला होता. मात्र, त्यांचा आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. आता लक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लागलं आहे. अशावेळी काँग्रेस राज्य निवडणूक आयोगाविरोधात कोर्टात जाणार असल्याची माहिती मिळतेय.

असंवेदनशिलतेचा कळस – देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडीने आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर काँग्रेसनं घेतलेला आक्षेप असंवेदनशिलतेचा कळस असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. हे दोन्ही आमदार आजारी आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातून मतपत्रिका पेटीत टाकली, असं फडणवीस म्हणाले.

काँग्रेसची भूमिका काय?

दरम्यान, राज्यसभेला या दोन्ही आमदारांनी स्वत: मतदान केलं होतं. आता त्यांनी सही स्वत: केली आणि मतपत्रिका दुसऱ्याच्या हातून मतपेटीत टाकली. दहा दिवसांत असा काय फरक पडला? असा सवाल काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केलाय.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.