विधान परिषद निवडणूक : राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी काँग्रेसची फिल्डिंग?

महाराष्ट्र विधानपरिषदेत 12 सदस्य नियुक्त करण्याचे राज्यपालांना अधिकार आहेत. मंत्रिमंडळाकडून शिफारस करण्यात आलेली नावे राज्यपालांकडून स्वीकारली जातात (Maharashtra Vidhan Parishad Governor Elected MLC Election)

विधान परिषद निवडणूक : राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी काँग्रेसची फिल्डिंग?
Maharashtra Vidhansabha
Follow us
| Updated on: Jun 08, 2020 | 3:11 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या 12 जागा रिकाम्या होत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या वाट्याला 4 जागा येणार आहेत. काँग्रेस आपल्या राजकीय नेत्याला राज्यपाल निर्देशित उमेदवारी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Maharashtra Vidhan Parishad Governor Elected MLC Election)

कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेत 12 सदस्य नियुक्त करण्याचे राज्यपालांना अधिकार आहेत. मंत्रिमंडळाकडून शिफारस करण्यात आलेली नावे राज्यपालांकडून स्वीकारली जातात. मात्र सध्या राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध पाहता तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नेत्यांची वर्णी सहजासहजी लागणे दुरापास्त मानले जाते.

हेही वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ

याआधी, राज्य मंत्रिमंडळाने दोनदा शिफारस करुनही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल निर्देशित उमेदवार म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव प्रलंबित ठेवला होता. दोन रिक्त जागा भरण्यासाठी राष्ट्रवादीने केलेली शिफारस मंत्रिमंडळाकडून नसल्याचे कारण देत आणि सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी असल्याचे सांगत राज्यपालांनी नकार दिला होता.

रिक्त जागी बिनविरोध निवडणूक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 18 मे रोजी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. उद्धव ठाकरेंची विधिमंडळाच्या सदस्यपदी वर्णी लागल्यामुळे राज्यावर घोंगावणारे राजकीय संकट दूर झाले आहे. शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचा 1, तर भाजपचे 4 असे एकूण 9 उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत.

भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्यासह नीलम गोऱ्हे यांना विधानपरिषदेची शपथ देण्यात आली. काँग्रेसकडून राजेश राठोड, तर राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी शपथ घेतली. (Maharashtra Vidhan Parishad Governor Elected MLC Election)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.