काटोलमधले हे अनिल देशमुख कोण? मतदारांना गोंधळात टाकण्यासाठी राजकीय पक्षांची मोठी खेळी
दरम्यान, रोहिणी गोकुळ खडसे व रोहिणी पंडित खडसे नावाचे राष्ट्रवादीच्या उमेदवारासोबत नामसाधर्म्य असलेल्या दोन अपक्षांचे अर्ज वैध ठरले आहेत. तिकीट नाकारल्यामुळे अनेक नेत्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आता याच बंडोबांना शांत करण्याच महायुती व महाविकास आघाडीसमोर आव्हान आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 29 ऑक्टोंबर रोजी संपली. महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. आता 4 ऑक्टोंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. युती आणि आघाडी दोघांकडूनही मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. तिकीट नाकारल्यामुळे अनेक नेत्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आता याच बंडोबांना शांत करण्याच महायुती व महाविकास आघाडीसमोर आव्हान आहे. दरम्यान काही मतदारसंघात मतदारांचा गोंधळ वाढवण्यासाठी नाम सार्धम्य असलेले उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
सर्वांचे लक्ष लागून असलेल्या काटोल विधानसभा मतदारसंघात अनिल देशमुख यांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नावाशी साधर्म्य असलेले अनिल शंकराव देशमुख हे नरखेड तालुक्यातील थुगाव (निपाणी) येथील रहिवासी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) पक्षाकडून हा नामांकन अर्ज भरण्यात आल्याचं त्यांच्या ॲफीडेव्हीटवर नमूद करण्यात आलय.
काटोलमधले हे अनिल देशमुख कोण?
नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे प्रतिनिधित्व करत होते. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. ऐनवेळी येथे अनिल देशमुख यांच्याऐवजी त्यांचे पुत्र सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तुतारी चिन्हवार उमेदवारी दाखल केली. काटोलमध्ये भाजपकडून चरण सिंग ठाकूर निवडणूक मैदानात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अनिल देशमुख यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आल्याने सगळ्यांचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे.
मतदारांना गोंधळात टाकण्याची खेळी
मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत निंबा पाटील या नावाच्या तीन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. पण, डोंगरगाव (ता.शिंदखेडा जि.धुळे) आणि खडके खुर्द (ता. एरंडोल) येथील चंद्रकांत निंबा पाटील या दोन अपक्षांचे अर्ज बाद झाले. दरम्यान, रोहिणी गोकुळ खडसे व रोहिणी पंडित खडसे नावाचे राष्ट्रवादीच्या उमेदवारासोबत नामसाधर्म्य असलेल्या दोन अपक्षांचे अर्ज वैध ठरले आहेत.
शिवसेना शिंदे गटाचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत
आता शिवसेना शिंदे गट उमेदवाराचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत होईल. मुक्ताईनगरात 29 ऑक्टोबरला शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी दाखल केली होती. यानंतर शेवटच्या क्षणी डोंगरगाव पो. वाघाडी बुद्रुक (ता. शिंदखेडा जि.धुळे) आणि खडके बुद्रुक ता. एरंडोल जि. जळगाव) येथील चंद्रकांत निंबा पाटील नावाच्या दोन अपक्षांनी उमेदवारी दाखल झाली. पण, उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांचे नाव समाविष्ट असलेल्या मतदार यादीची प्रमाणित नक्कल वेळेत छाननीच्या वेळेस सादर केली नाही. यामुळे दोघांचे अर्ज बाद झाले. दरम्यान, रोहिणी गोकुळ खडसे व रोहिणी पंडित खडसे नावाचे राष्ट्रवादीच्या उमेदवारासोबत नामसाधर्म्य असलेल्या दोन अपक्षांचे अर्ज वैध ठरले आहेत.