Video : आणि आ. संजय दौंड यांनी खरोखरच खाली डोकं वर पाय केलं, राज्यपालांच्या विरोधात निषेधासन

विधानपरिषद आमदार संजय दौड (Sanjay Daund) यांनी पायऱ्यांवरच खाली डोकं वर पाय करत राज्यापालांचा निषेध केला. संजय दौड हे बीडमधून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. राज्यपालांनी राज्याचा, राष्ट्रगीताचा अपमान केला आहे, मी खाली डोकं वर पाय करून त्यांचा निषेध केला, असं दौंड म्हणाले.

Video : आणि आ. संजय दौंड यांनी खरोखरच खाली डोकं वर पाय केलं, राज्यपालांच्या विरोधात निषेधासन
आमदार संजय दौंड यांचे शीर्षासनImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 12:41 PM

मुंबई : विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Assembly Budget Session) पहिल्या मिनिटापासून वादळी ठरताना दिसत आहे. कारण अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत भाजप आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवरच घोषणाबाजी केली. तर राज्यपालांच्या अभिभाषणावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांंनी घोषणाबाजी  केल्याने भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर विधानपरिषद आमदार संजय दौड (Sanjay Daund) यांनी चक्क विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच खाली डोकं वर पाय केलं. राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रगीत पूर्ण होण्याआधीच निघून जात राज्याचा अपमान केल्याचा निषेध  करण्यासाठी दौंड यांनी शीर्षासन केल्याचं सांगितलं. संजय दौड हे बीडमधून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. राज्यपालांनी राज्याचा, राष्ट्रगीताचा अपमान केला आहे, मी खाली डोकं वर पाय करून त्यांचा निषेध केला, अशी प्रतिक्रिया दौंड यांनी शीर्षासनानंतर दिली. आघाडी सरकार व्यवस्थित काम करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

पाहा व्हिडीओ :

शीर्षासनावेळी काय काय घडलं?

  1. आमदार संजय दौड पायऱ्यांवरुन खाली चालत आले
  2. आपला चष्मा मोबाईल आणि खिशातल्या गोष्टी एकाच्या हातात दिला
  3. समोर येऊन इतरांना हाताने संजय दौंड यांनी खुणावले
  4. खाली डोकं वर पाय करण्यासाठी सज्ज झाले
  5. डोकं जमिनीवर टेकून आमदार दौंड यांनी एका क्षणात पाय वर करुन दाखवले
  6. हे करत असताना त्यांच्या खिशातले कागद आणि कागदाचे तुकडे खाली पडले
  7. मागे जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा सुरुच होत्या
  8. जवळपास मिनिटभर संजय दौंड शीर्षासनात, मागे आमदारांची घोषणाबाजी

संजय दौंड काय म्हणाले?

“आज राज्यपालांचं अभिभाषण होतं. राज्यपालांनी अभिभाषण केलं नाही. शासनाची भूमिका राज्यपाल मांडत असतात. राज्यामध्ये (महाविकास) आघाडी सरकारने चांगलं काम केलं आहे. हे काम विरोधकांना ऐकायचं नव्हतं. राज्यपालांनी औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह शब्द वापरले होते. विरोधकांनी गोंधळ घातला. राज्यपाल राष्ट्रगीत न होता निघून गेले. त्यांनी या राज्याचा अपमान केला आहे, त्यांचा मी धिक्कार करतो. त्यांचा निषेध म्हणून मी खाली डोकं वर पाय केलं” असं संजय दौंड शीर्षासनानंतर म्हणाले.

भाजप आमदारांची घोषणाबाजी

याआधी विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपने आंदोलन केलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाकडून पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलं. नवाब मलिक यांचा राजीनामा झाला पाहिजे, दाऊदच्या दलाल मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी घोषणाबाजी भाजप आमदारांनी केली.

संबंधित बातम्या :

राज्यपाल येताच शिवाजी महाराजांच्या वक्तव्यावर आमदारांची घोषणाबाजी, जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रगीतालाही थांबले नाहीत

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.