सांगलीचा आढावा | 8 जागांवर कोण बाजी मारणार?
सांगली जिल्हा राजकीयदृष्ट्या चर्चेत आणि बलाढ्य नेत्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
सांगली : सांगली जिल्हा राजकीयदृष्ट्या चर्चेत आणि बलाढ्य नेत्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, आर आर पाटील, पतंगराव कदम यांच्यापासून ते जयंत पाटील, सुरेश खाडे, सदाभाऊ खोत, विश्वजीत कदम यांच्यापर्यंत नेत्यांची रांग या जिल्ह्यात पाहायला मिळते. सांगली जिल्ह्यात विधानसभेच्या 8 जागा आहेत. 2014 च्या निवडणुकीत भाजपने 4, राष्ट्रवादी 2, काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येक एक जागी विजय मिळवला होता. आता 2019 मध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सांगली जिल्हा – 08 (Sangli MLA List)
281 – मिरज – सुरेश खाडे (भाजप)
282 – सांगली – सुधीर गाडगीळ (भाजप)
283 – इस्लामपूर – जयंत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
284 – शिराळा – शिवाजीराव नाईक (भाजप)
285 – पलूस कडेगाव – विश्वजीत कदम (काँग्रेस)
286 – खानापूर – अनिल बाबर (शिवसेना)
287 – तासगाव-कवठेमहांकाळ – सुमनताई पाटील (राष्ट्रवादी)
288 – जत – विलासराव जगताप (भाजप)