ठाकरेंचं मतही माझ्या बाजूने वळवेन, महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदाराचा निर्धार

27 वर्षीय झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचे पुत्र यंदाचे सर्वात तरुण आमदार आहेत

ठाकरेंचं मतही माझ्या बाजूने वळवेन, महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदाराचा निर्धार
Follow us
| Updated on: Oct 28, 2019 | 3:11 PM

मुंबई : विधीमंडळाची पायरी चढणारा सर्वात तरुण आमदार कोण, हे समोर आलं आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि वांद्रे पूर्व मतदारसंघातील शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांना पराभवाची धूळ चारणारे काँग्रेसचे झिशान सिद्दीकी हे यंदाच्या विधानसभेतील सर्वात तरुण आमदार (Maharashtra Vidhansabha Youngest MLA) ठरले आहेत.

‘ठाकरे कुटुंब आता माझ्या मतदारसंघात येतं. पाच वर्षांनी त्यांनी मला मतदान करावं, इतकं चांगलं काम करण्याची माझी इच्छा आहे. माझ्या मतदारसंघाच्या भल्यासाठी चांगलं काम करणं, हे एकच माझं ध्येय आहे. वांद्रे पूर्वेकडील समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील असेन’ असंही झिशान सांगतात.

27 वर्षीय झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचे पुत्र. आतापर्यंत बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितीज ठाकूर (36 वर्ष, निवडून आले त्यावेळी 31 वर्ष) सर्वात तरुण आमदार होते. मात्र झिशान यांनी त्यांचा रेकॉर्ड मोडित काढला आहे.

‘मी सर्वांचा आमदार आहे. ज्यांनी मला मत दिलं फक्त त्यांच्यासाठी काम करण्याचा संकुचित विचार मी करणार नाही. गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघातील प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं होतं. मी तरुण असल्यामुळे तरुणांचे प्रश्न मला समजतात’ असंही झिशान (Maharashtra Vidhansabha Youngest MLA) यांनी सांगितलं.

झिशान सिद्दीकी यांनी विश्वनाथ महाडेश्वर यांचा 5 हजार 790 मतांनी पराभव केला. ‘मातोश्री’च्या अंगणातच पराभव स्वीकारावा लागण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढवली आहे. महाडेश्वर यांना 32 हजार 547 मतं मिळाली, तर शिवसेना बंडखोर तृप्ती सावंत यांनी 24 हजार 071 मतं घेतली. मनसे उमेदवार अखिल चित्रेंना 10 हजार 683 मतं मिळाली आहेत. सेनेला बंडखोरी थोपवण्यात यश आलं असतं, तर शिवसेनेला आपला गड राखता आला असता.

वांद्रे पूर्व मतदारसंघाची पार्श्वभूमी

2015 मध्ये शिवसेनेचे तत्कालीन आमदार बाळा सावंत यांचं निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली होती. शिवसेनेने प्रकाश सावंत यांची पत्नी तृप्ती सावंत यांनाच उमेदवारी दिली. तृप्ती सावंत पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना हरवून जवळपास 20 हजारांच्या मताधिक्याने जिंकून आल्या होत्या.

‘मातोश्री’वर अंगणातच पराभवाची नामुष्की, महापौर हरले, बंडखोर तृप्ती सावंतही पराभूत

यंदाच्या तिकीटवाटपावेळी शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या ‘वांद्रे पूर्व’ मतदारसंघात तिढा निर्माण झाला होता. अखेर विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलत शिवसेनेने उमेदवारीची माळ मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या गळ्यात टाकली गेली. त्यामुळे नाराज झालेल्या तृप्ती सावंत यांनी बंडाचं निशाण फडकावलं होतं.

राज्याच्या विविध भागातील बंडोबांना थंड करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ‘मातोश्री’च्या अंगणातील बंडखोरी रोखण्यात अपयशी ठरले होते. बाळा सावंत यांच्याशी असलेल्या घरच्या संबंधांची आठवण करुन देऊनही तृप्ती सावंत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला नव्हता

बाळा सावंत घरचा माणूस, भावनिक नातं तोडू नका, उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतरही तृप्ती सावंत बंडखोरीवर ठाम

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.