अनिल भैय्यांची पोकळी भरुन काढणार, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश (Shankarrao Gadakh Join Shivsena) केला.
शिर्डी : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवबंधन बांधत आज (11 ऑगस्ट) शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर शिवबंधन बांधत त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. (Shankarrao Gadakh Join Shivsena)
शिवसेनेचे माजी आमदार आणि उपनेते अनिल भैय्या राठोड यांच्या काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर नगर जिल्हयात शिवसेनेत पोकळी निर्माण झाली होती. मात्र शंकरराव गडाख यांच्या शिवसेना प्रवेशानंतर ती भरुन निघणार आहे. विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातून शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नव्हता. मात्र गडाखांच्या प्रवेशाने आता शिवसेनेला नवसंजीवनी मिळणार आहे.
आज शिवसेना पक्ष प्रमुख, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते मातोश्री निवासस्थानी शिवबंधन बांधून शिवसेना पक्ष प्रवेश केला यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.@ShivSena @mieknathshinde @Subhash_Desai @NarvekarMilind_ @AUThackeray pic.twitter.com/UQsQT57Bz8
— Shankarrao Gadakh Patil (@GadakhShankarao) August 11, 2020
शंकरराव गडाख यांनी नेवासा विधानसभा मतदारसंघातून क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून निवडणूक लढवली होती. आता गडाख यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केल्याने नगर जिल्हयात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. (Shankarrao Gadakh Join Shivsena)
शिवसेना प्रवेशानंतर शंकरराव गडाख यांची प्रतिक्रिया
“शिवसेना पक्ष हा कष्टकरी शेतकरी, गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या विचारधारेशी आमचे विचार जुळत असल्यामुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रति असलेल्या निष्ठा आणि विश्वासामुळे शिवसेना पक्षात प्रवेश करत आहे,” अशी प्रतिक्रिया शंकरराव गडाख यांनी शिवसेना प्रवेशानंतर दिली.
“यापुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माझ्या शेतकरी बांधव आणि गोरगरीब जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहील,” असेही ट्विट त्यांनी केले आहे.
शिवसेना पक्ष हा कष्टकरी शेतकरी,गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा पक्ष आहे त्यामुळे शिवसेना पक्षाच्या विचारधारेशी आमचे विचार जुळत असल्यामुळे व सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या प्रति असलेल्या निष्ठा व विश्वासामुळे शिवसेना पक्षात प्रवेश करून
— Shankarrao Gadakh Patil (@GadakhShankarao) August 11, 2020
यापुढे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतूत्वाखाली माझ्या शेतकरी बांधव व गोरगरीब जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहील.????#जयमहाराष्ट्र
— Shankarrao Gadakh Patil (@GadakhShankarao) August 11, 2020
शंकरराव गडाख कोण आहेत?
- शंकरराव गडाख हे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव आहेत.
- ते अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील आमदार आहेत.
- त्यांनी शेतकरी क्रांतिकारक पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती.
- मोठ्या मताधिक्यांनं विजयी झाल्यानंतर त्यांनी सत्तास्थापनेदरम्यान शिवसेनेला पाठिंबा दिला होता.
- सध्या ते उस्मानाबादचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री आहेत.
- शंकरराव गडाख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या जवळचे मानले जातात.(Shankarrao Gadakh Join Shivsena)
संबंधित बातम्या :
शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे जलद, सेना आमदारांचा मुख्यमंत्र्यांकडे नाराजीचा सूर
उद्धव ठाकरेंची शिवसेना आमदारांसोबत तब्बल 4 तास बैठक, रवींद्र वायकर यांची खास पदी नियुक्ती