विधानसभा स्वबळावर लढूया, महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या बैठकीत सूर
मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत चिंतन करण्यासाठी आयोजित महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या बैठकीत एक वेगळाच सुर निघाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते काँग्रेससाठी काम करत नसल्याचे सांगत महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा स्वबळावर लढण्याची मागणी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढल्यास पक्षबळकटीसाठीही त्याची मदत होईल, असाही सुर या बैठकीत निघाला. त्यामुळे […]
मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत चिंतन करण्यासाठी आयोजित महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या बैठकीत एक वेगळाच सुर निघाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते काँग्रेससाठी काम करत नसल्याचे सांगत महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा स्वबळावर लढण्याची मागणी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढल्यास पक्षबळकटीसाठीही त्याची मदत होईल, असाही सुर या बैठकीत निघाला. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची युती होणार की ते स्वबळावर विधानसभेला सामोरे जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजप-शिवसेना महायुतीकडून लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतरही काँग्रेस-राष्ट्रवादीत विधानसभा एकत्रित लढण्याविषयी एकमत नसल्याचेच यातून स्पष्ट होत आहे. आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काँग्रेस वरिष्ठांची मात्र राष्ट्रवादीशी तडजोड करण्याची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. आगामी विधानसभा महाआघाडीने सोबत लढावी याविषयी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जवळजवळ एकमत दिसते. अगदी वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घेण्याची भाषा काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे युवक काँग्रेसच्या या वेगळ्या सुराला काँग्रेसचे वरिष्ठ नेते कसे शांत करणार हा प्रश्नच आहे.