स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आघाडी होणार का? जयंत पाटलांनी सांगितला फॉर्म्यूला

स्थानिक पातळीवर आघाड्यांचे योग्य ते निर्णय घेऊ. असे निर्णय तेथील परिस्थितीवर अवलंबून असतील. मात्र, ते करतानाही महाविकास आघाडीच्या मूळ संकल्पनेला धरूनच होतील, असं पाहिलं जाईल. महाविकास आघाडी कायम राहावी, अशीच आमची भूमिका आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आघाडी होणार का? जयंत पाटलांनी सांगितला फॉर्म्यूला
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 9:47 PM

अहमदनगर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी असणार का? या प्रश्नावर महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळी मतं मांडली जात आहेत. नाना पटोले, संजय राऊत यांनी अनेकदा स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी कायम राहावी अशीच आमची भूमिका असल्याचं म्हटलंय. ते आज अहमदनगरमध्ये बोलत होते. (Mahavikas Aghadi also leads in local body elections, Hints of Jayant Patil)

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग किती सदस्यांचे असावेत, या मुद्द्यावर महाविकास आघाडीतील पक्षांनी वेगवेगळी मतं मांडली. त्यावर चर्चा होऊन सरकारचा निर्णय झालाय, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. ते अहमदनगरला पत्रकारांशी बोलत होतेय. तसेच स्थानिक पातळीवर आघाड्यांचे योग्य ते निर्णय घेऊ. असे निर्णय तेथील परिस्थितीवर अवलंबून असतील. मात्र, ते करतानाही महाविकास आघाडीच्या मूळ संकल्पनेला धरूनच होतील, असं पाहिलं जाईल. महाविकास आघाडी कायम राहावी, अशीच आमची भूमिका आहे,’ असं जयंत पाटील म्हणाले.

‘कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी नेत्यांना बोलावं लागतं’

त्याचबरोबर महाविकास आघाडी म्हणून नेमकी भूमिका अद्याप ठरलेली नाही. मात्र, निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत. आपापल्या पक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकांमधून नेते आपली मतं व्यक्त करीत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी अनेकदा नेत्यांना बोलावं लागतं. मात्र, हे काही अंतिम ठरू शकत नाही. आमची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आघाडी होण्यास प्राधान्य देण्याची भूमिका आहे. तसा आमचा प्रयत्नही राहील, असा दावाही जयंत पाटील यांनी केलाय.

3 सदस्यीय प्रभाग पद्धत, अध्यादेश राज्यपालांकडे पाठवला

मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धतीचा महाविकास आघाडी सरकारनं घेतलेला निर्णय कायम असणार आहे. कारण, तसा अध्यादेश आज महाविकास आघाडी सरकारकडून जारी करण्यात आला आहे. हा अध्यादेश आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला आहे. आता राज्यपाल कोश्यारी या अध्यादेशावर स्वाक्षरी करणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

काल पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महापालिका निवडणूक प्रभाग पद्धतीवर चर्चा झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2 सदस्यीय प्रभाग पद्धतीची मागणी लावून धरण्यात आली होती. मात्र, शेवटी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर त्याबाबतचा अध्यादेशही जारी करण्यात आला. आता तो अध्यादेश राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला आहे.

जयंत पाटलांचा भाजपला सवाल

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अहमदनगर येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे आणि हे जाणीवपूर्वक सुरू आहे, असा आरोप करतानाच या देशात आणि राज्यात ज्यांनी खरंच मनीलॉड्रींग केलंय ते बाजुला राहिले आणि ज्यांच्यावर केंद्रीय एजन्सीने ठपका ठेवला ते भाजपमध्ये गेले आहेत. त्यांचं काय झालं? हे एकदा ईडीने जनतेला सांगावे, असं आवाहन पाटील यांनी केलं.

इतर बातम्या :

काँग्रेसची मागणी धूडकावली? तीन सदस्यीय प्रभाग प्रस्ताव राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठवला, शिक्कामोर्तब होणार?

अजितदादा, अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला होता, अनिल परबांचा का नाही?, नितेश राणेंचा सवाल

Mahavikas Aghadi also leads in local body elections, Hints of Jayant Patil

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.