मंत्र्यांच्या 31 बंगल्यांच्या डागडुजीसाठी 15 कोटींची उधळपट्टी

सार्वजनिक बांधकाम विभागाने मंत्र्यांच्या 31 बंगल्यासाठी निविदा काढल्या आहेत. निविदेनुसार, मंत्र्यांच्या बंगल्यांवर एकूण 15 कोटींचा खर्च होणार आहे.

मंत्र्यांच्या 31 बंगल्यांच्या डागडुजीसाठी 15 कोटींची उधळपट्टी
Follow us
| Updated on: Feb 12, 2020 | 4:01 PM

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाने मंत्र्यांच्या 31 बंगल्यासाठी निविदा काढल्या आहेत. निविदेनुसार, मंत्र्यांच्या बंगल्यांवर एकूण 15 कोटींचा खर्च होणार असल्याचा दावा केला जात आहे (15 crore to repair ministers Bungalow). आश्चर्याची बाब म्हणजे निविदा सादर होण्याआधीच बंगल्यांच्या डागडुजीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मंत्र्यांना खुश करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने बंगल्याची कंत्राटं देण्यास सुरुवात केली आहे (15 crore to repair ministers Bungalow).

या 31 बंगल्यांवर जवळपास 15 कोटींची उधळपट्टी होणार असल्याचा दावा आहे. म्हणजेच साधरणत: एका बंगल्यावर 80 लाख ते दीड कोटीपर्यंत खर्च होणार आहे. यापैकी सर्वात जास्त खर्च हा बाळासाहेब थोरातांच्या रॉयल स्टोन आणि छगन भुजबळांच्या रामटेक या बंगल्यावर होतो आहे, अशी माहिती आहे. रॉयल स्टोनसाठी 1 कोटी 81 लाख तर, रामटेकसाठी 1 कोटी 48 लाखांचा खर्च होत आहे. यामध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सारंग बंगल्याचाही समावेश आहे. फडणवीसांच्या सारंग बंगल्यावर तब्बल 92 लाख रुपयांचा खर्च केला जात आहे, अशी माहिती समोर येत आहे.

राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्यांच्या डागडुजीसाठी गेल्या पाच वर्षांमध्ये तब्बल10 पट वाढ झाली आहे. मलबार हिल येथील मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी सरकारने पाच वर्षात 52 कोटींची उधळण केल्याचं कॅगच्या अहवालात समोर आलं आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या कुठल्या मंत्र्याला कुठला बंगला?

सरकारी बंगले वाटपानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाट्याला देवगिरी बंगला आला. तर अशोक चव्हाण यांना मेघदूत, दिलीप वळसे पाटील यांना शिवगीरी, अनिल देशमुख यांना ज्ञानेश्वरी, डॉ. राजेंद्र शिंगणे-सातपुडा आणि राजेश टोपे यांना जेतवन हे बंगले मिळाले. तर, छगन भुजबळ यांना रामटेक,  जयंत पाटील यांना सेवासदन आणि एकनाथ शिंदे यांना रॉयलस्टोन हे बंगले मिळाले आहेत. आदित्य ठाकरे यांना अ-6  निवासस्थान मिळालं आहे. बच्चू कडू यांना रॉकिहिल टॉवर 1202, विश्वजीत कदम यांना निलांबरी 302,  सतेज पाटील यांना सुरुची-3, आदिती तटकरे यांना सुनिती -10 हे निवासस्थान मिळालं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.