कृषीमंत्रीपद सोडण्यास दादा भुसे तयार!, पण शिवसेना खडसेंसाठी कृषी खातं सोडणार?

भाजपला राम-राम ठोकल्यानंतर एकनाथ खडसे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार अशी चर्चा सुरु आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य आहे. त्यांनी सांगितलं तर आपण कृषीमंत्रीपद सोडण्यास तयार असल्याचं कृषीमंत्री दादा भूसे यांनी टीव्ही 9 मराठी बोलताना सांगितलं

कृषीमंत्रीपद सोडण्यास दादा भुसे तयार!, पण शिवसेना खडसेंसाठी कृषी खातं सोडणार?
agricultural minister dada bhuse
Follow us
| Updated on: Oct 23, 2020 | 12:40 PM

मालेगाव: एकनाथ खडसे यांनी भाजपला राम-राम ठोकल्यानंतर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याचा बातम्या समोर येत आहेत. मंत्रिमंडळात फेरबदल करुन शिवसेनेच्या कोट्यातील कृषीमंत्रीपद खडसेंना दिलं जाणार अशी चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आपण कृषीमंत्रीपद सोडण्यास तयार आहोत. पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय आपल्याला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री दादा भुसे यांनी टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना दिली आहे. दरम्यान, जनतेशी थेट संपर्कात असणारं शिवसेना कृषी खातं सोडण्यास तयार नसल्याची माहिती मिळतेय. (Dada bhuse ready to resign as agricultural minister )

‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वाधिकार आहेत. ते जो निर्णय घेतील, जो आदेश देतील त्याचं पालन करणं हे शिवसैनिकाचं काम आहे आणि दादा भूसे एक शिवसैनिक आहे’, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

एकनाथ खडसे यांचा थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर खडसेंना मंत्रिमंडळात स्थान द्यायचं की नियोजन मंडळावर त्यांची वर्णी लावायची, याबाबत महाविकास आघाडीत संभ्रम असल्याचं पाहायला मिळतंय. कारण, शिवसेना कृषीमंत्रीपद सोडण्यास तयार नसल्याची माहिती मिळतेय. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाडही आपल्याकडील गृहनिर्माण खातं खडसेंना देण्यास तयार नसल्याचं कळतंय. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

“भाजपला नामोहरम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेवर दबाव टाकू शकतो”

राज्यात महाविकास आघाडीचा सर्वात मोठा शत्रू सध्या भाजप आहे. त्यामुळं भाजपला नामोहरम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेवरही दबाव टाकू शकतो. शिवसेनेला कृषी खातं सोडायला लावून, तिथं खडसेंची वर्णी लावली जाऊ शकते, असं मत राजकीय विश्लेषक संजय भोकरे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केलं आहे. दरम्यान शिवसेना अडून बसली तर मध्यम मार्ग म्हणून नियोजन मंडळावर खडसेंना घेतलं जाईल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या:

खडसेंना कॅबिनेट दर्जासाठी आटापिटा, शिवसेना कृषि खात्यावर, तर आव्हाड ‘गृहनिर्माण’वर अडल्याची चर्चा

उत्तर महाराष्ट्रात भाजपचा एकही आमदार, खासदार दिसणार नाही – अनिल पाटील

एकट्या फडणवीसांमुळं पक्ष चालत नाही, भाजपमध्ये कुठलाही निर्णय सामूहिकरित्या- दानवे

Dada bhuse ready to resign as agricultural minister

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.