AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माळेगाव साखर कारखाना निवडणूक : अजित पवारांनी सत्ता खेचून आणली

मतमोजणीवेळी दोन मतं बाद ठरवल्याने सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाचीचा प्रकार घडला होता.

माळेगाव साखर कारखाना निवडणूक : अजित पवारांनी सत्ता खेचून आणली
| Edited By: | Updated on: Feb 25, 2020 | 11:07 AM
Share

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शर्थीने सत्ता खेचून आणली. राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनलला 21 पैकी 16 जागांवर विजय मिळाला आहे, तर सत्ताधारी चंद्रराव तावरेंच्या पॅनेलला अवघ्या पाच जागा मिळवण्यात यश आलं आहे. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजयश्री मिळवत अजित पवारांनी 2015 च्या पराभवाचा वचपा काढला. (Malegaon Result Live Update)

‘सहकार बचाव पॅनल’च्या रंजन तावरे यांनी मतमोजणीला आक्षेप घेतल्यामुळे काल सकाळी (24 फेब्रुवारी) सुरु झालेली मतमोजणी काही काळ थांबली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही मतमोजणीची प्रक्रिया सुरु राहिली. बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी (23 फेब्रुवारी) मतदान झालं होतं, तब्बल 92 टक्के मतदान झाल्याने निळकंठेश्वर पॅनल आणि सहकार बचाव पॅनलमध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती.

मतमोजणी झालेल्या जागांपैकी विजयी उमेदवार

गट नंबर 1 (माळेगाव)

संजय काटे- निळकंठेश्वर पॅनल बाळासाहेब भाऊ तावरे- निळकंठेश्वर पॅनल रंजन काका तावरे- सहकार बचाव

गट नंबर 2 (पणदरे)

तानाजी कोकरे- निळकंठेश्वर पॅनल केशवराव जगताप- निळकंठेश्वर पॅनल योगेश जगताप- निळकंठेश्वर पॅनल

गट नंबर 3 (सांगवी)

सुरेश खलाटे- निळकंठेश्वर पॅनल चंद्रराव  तावरे- सहकार बचाव रणजित खलाटे- सहकार बचाव

Malegaon Result Live Update

गट नंबर 4 (निरावागज)

मदनराव देवकाते- निळकंठेश्वर पॅनल बन्सीलाल आटोळे- निळकंठेश्वर पॅनल प्रताप आटोळे- सहकार बचाव

गट नंबर 5 (बारामती)

नितीन सातव- निळकंठेश्वर पॅनल राजेंद्र ढवाण- निळकंठेश्वर पॅनल गुलाबराव गावडे- सहकार बचाव

ब वर्ग

स्वप्नील जगताप – निळकंठेश्वर पॅनल सौ. संगीता कोकरे – निळकंठेश्वर पॅनल सौ. अलका पोंदकुले – निळकंठेश्वर पॅनल

Malegaon Result Live Update

दरम्यान, मतमोजणीवेळी दोन मतं बाद ठरवल्याने रंजन तावरे आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाचीचा प्रकार घडला होता. मतमोजणी कक्षातच हा वाद झाला होता. रंजन तावरे यांनी मतमोजणीला आक्षेप घेतला होता. मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणावरील सीसीटीव्ही पाहूनच मोजणी सुरु करण्याची मागणी तावरेंनी केली होती.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘निळकंठेश्वर पॅनल’विरोधात सत्ताधारी चंद्रराव तावरे यांच्या समर्थकांचा ‘सहकार बचाव पॅनल’ निवडणुकीच्या रिंगणात होता. साखर कारखान्याच्या संचालक मंडळावरील 21 जागांसाठी निवडणूक रिंगणात एकूण 56 उमेदवार होते. यामध्ये 14 अपक्ष उमेदवारांचाही समावेश होता.

शरद पवारांचा कारखाना

माळेगाव हा शरद पवार यांचा कारखाना म्हणूनच ओळखला जातो. शरद पवार हे या कारखान्याचे सभासद आहेत. आतापर्यंत 1997 आणि 2015 च्या निवडणुका वगळता या कारखान्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. मात्र मागील निवडणुकीपूर्वी केंद्र आणि राज्यातील सत्ता गेल्यानंतर माळेगाव कारखानाही राष्ट्रवादीच्या हातून गेला होता.

2015 मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढून कारखाना ताब्यात घेण्यासाठी अजित पवार यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची, असा चंगच अजित पवारांनी बांधला होता.

Malegaon Result Live Update

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.