Mamata Banerjee met PM Modi : ममता बॅनर्जींना घेतली पीएम मोदी यांची भेट, दोघांमध्ये 45 मिनिटे झाली चर्चा

पश्चिम बंगालचे भाजपचे वरिष्ठ नेते दिलीप घोष यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदी यांना भेटायल्या गेल्या. कारण आमची राजकीय सेटिंग झाल्याचा संदेश त्यांना द्यायचा आहे.

Mamata Banerjee met PM Modi : ममता बॅनर्जींना घेतली पीएम मोदी यांची भेट, दोघांमध्ये 45 मिनिटे झाली चर्चा
ममता बॅनर्जींना घेतली पीएम मोदी यांची भेट
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 6:30 PM

नवी दिल्ली : दिल्लीत आज पश्चिम बंगालच्या (W. Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. दोघांमध्ये काही महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. दोघांमध्ये सुमारे 45 मिनिटे चर्चा झाली. पंतप्रधानांशी भेटीनंतर ममता बॅनर्जी तिथून निघाल्या. पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी यांची भेट कित्तेक अर्थ काढले जात आहेत. काही लोकं याला राजकीय सेटिंग असल्याचा आरोप करत आहेत. काही जण शिक्षक भरती (Teacher Recruitment) घोटाळा प्रकरणी ईडी कारवाईची भीती सांगत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांविरोधात सीबीआय आणि ईडीच्या कारवाईमुळं ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा दिल्ली दौरा हा फिक्सिंगचा भाग असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.

भेटीसंदर्भात माहिती जनतेला द्यावी

भाजपचे माजी प्रदेश अध्यक्ष तथागत रॉय यांनी पंतप्रधान मोदी यांना सल्ला दिला. ते म्हणाले, ममता बॅनर्जींसोबत भेट कशासाठी झाली, हे जनतेला सांगायला हवं. तथागत रॉय यांनी ट्वीट केलंय. कोलकात्यात सेटिंगवरून चर्चा सुरू होती. याचा अर्थ पंतप्रधान आणि ममता बॅनर्जी यांच्यांत नेमकं सिक्रेट काय आहे. तृणमूल काँग्रेसचे हत्त्यारे आणि चोर अशाप्रकारे मोकळे सुटतील. त्यामुळं आम्हाला सांगावं की, अशी कोणतीही सेटिंग झालेली नाही. तथागत रॉय यांनी आपलं ट्वीट पंतप्रधान मोदी यांना टॅग केलंय.

हे सुद्धा वाचा

दिलीप घोष यांनीही सरकारला दिला सल्ला

पश्चिम बंगालचे भाजपचे वरिष्ठ नेते दिलीप घोष यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदी यांना भेटायल्या गेल्या. कारण आमची राजकीय सेटिंग झाल्याचा संदेश त्यांना द्यायचा आहे. केंद्र सरकारनं ममता बॅनर्जी यांच्या जाळ्यात अडकू नये, असा सल्ला दिला.

2016 पासून सुरू आहे मॅच फिक्सिंग

पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीवरून काँग्रेससह अन्य पक्षांनी निशाणा साधला. बंगाल काँग्रेसचे प्रवक्ता रिट्जू घोषाल यांनी आरोप केलाय. ते म्हणाले, ही मॅच फिक्सिंग 2016 च्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीपासून सुरू आहे. ईडीनं कोळसा घोटाळा प्रकरणी अभिषेक बॅनर्जी यांची दोन वेळा चौकशी करण्यात आली. परंतु, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना रोज त्रास दिला जात आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.