मोठी बातमी ! मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि बजोरिया यांना अपात्र करा; ठाकरे गटाचं विधीमंडळ सचिवांना पत्र

| Updated on: Jul 17, 2023 | 12:20 PM

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाने एक मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाने विधीमंडळ सचिवांना पत्र पाठवून तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे.

मोठी बातमी ! मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि बजोरिया यांना अपात्र करा; ठाकरे गटाचं विधीमंडळ सचिवांना पत्र
viplove bajoria
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 17 जुलै 2023 : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाने एक मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाने विधीमंडळ सचिवांना पत्र पाठवून तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि आमदार विप्लव बजोरिया यांना अपात्र करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. त्यामुळे या तिन्ही आमदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच या आमदारांच्या अपात्रतेवर काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि विप्लव बजोरिया यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. या तिन्ही आमदारांनी पक्ष सोडताना पक्ष नेतृत्वावर टीका केली होती. तसेच पक्षातील अनागोंदी कारभारही टीका केली होती. तसेच पक्षातील काही नेत्यांवरही टीकास्त्र सोडलं होतं. या तिघांनी पक्ष सोडल्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र, आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या तिघांना अपात्र करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाने तसं पत्रच विधीमंडळ सचिवांना दिलं आहे. त्यामुळे विधीमंडळ सचिव काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

अधिवेशनात विरोधक आक्रमक

दरम्यान, आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झाले. काँग्रेस आणि ठाकरे गटाने विधीमंडळाच्या पायऱ्यावर उभं राहून प्रचंड गोंधळ घातला. यावेळी राज्य सरकारचा जोरदार निषेध नोंदवला. हे सरकारच घटनाबाह्य असल्याचा दावा विरोधकांनी केला. शिंदे सरकार हाय हाय… अशी घोषणाबाजीही विरोधकांनी केली.

विरोधकांचा सभात्याग

त्यानंतर विरोधकांनी विधानसभेत शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरला. शिंदे सरकार शेतकरी प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे, पण सरकार काहीच करत नसल्याचंही विरोधकांनी म्हटलं आहे. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवत सभात्याग केला.