AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवारांमध्ये ‘वर्षा’ बंगल्यावर तासभर खलबतं, नेमकी चर्चा काय?

वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांत्याच जवळपास तासभर खलबतं झाली.

उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवारांमध्ये 'वर्षा' बंगल्यावर तासभर खलबतं, नेमकी चर्चा काय?
Sharad Pawar and Uddhav Thackeray
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 8:50 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांसह मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ही भेट होणार असल्याची माहिती देण्यात आलीय. त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांत्याच जवळपास तासभर खलबतं झाली. या बैठकीत मराठा, ओबीसी, पदोन्नती आरक्षणासह अन्य महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. (CM Uddhav Thackeray, Sharad Pawar and  Ajit Pawar meeting at Varsha Bungalow)

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, जीएसटी आणि राज्यातील कोरोना परिस्थितीवर पुढील पावलांबद्दल चर्चा झाली. या बैठकीचा मुख्य मुद्दा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर उद्या मुद्द्यांवर भर द्यायचा, आरक्षणासाठी केंद्रानं काय पाऊल टाकणं गरजेचं आहे, केंद्रासोबत याबाबत पुढे ही चर्चा कशी वाढवत न्यायची, यावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. या बैठकीत शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

मंगळवारी 11 वा. पंतप्रधानांसोबत बैठक, 12 वा. पत्रकार परिषद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ उद्या सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय. या शिष्टमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री अशोक चव्हाण, मंत्री एकनाथ शिंदे असतील अशी माहिती मिळत आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी 12 वाजता महाराष्ट्र सदन इथं पत्रकार परिषद घेणार असल्याचंही सांगण्यात आलंय.

महामंडळांबाबत चर्चा?

दरम्यान, काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पवारांशी राज्यातील महामंडळांवरील नियुक्त्यांसंदर्भात चर्चा केली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असून महामंडळांवरील नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात महामंडळावरील नियुक्त्यांबाबतही चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी पंतप्रधानांना भेटणार; मराठा आरक्षणावर होणार चर्चा

VIDEO: महामंडळांवरील नियुक्त्या लवकरच जाहीर होणार?; पवार-थोरात भेटीत काय घडलं?, वाचा

CM Uddhav Thackeray, Sharad Pawar and  Ajit Pawar meeting at Varsha Bungalow

'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.