सरकारच्या मानेवर बसून आरक्षण घेण्यासाठी सज्ज व्हा, समरजितसिंह घाटगे आक्रमक

समजितसिंह घाटगे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिलाय. मराठा समाजाने आता सरकारच्या मानेवर बसून आरक्षण मिळवण्यासाठी सज्ज राहावे असं आवाहन त्यांनी केलंय.

सरकारच्या मानेवर बसून आरक्षण घेण्यासाठी सज्ज व्हा, समरजितसिंह घाटगे आक्रमक
भाजप नेते समरजितसिंह घाटगे
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 4:36 PM

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्र भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आज समजितसिंह घाटगे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिलाय. मराठा समाजाने आता सरकारच्या मानेवर बसून आरक्षण मिळवण्यासाठी सज्ज राहावे असं आवाहन त्यांनी केलंय. लॉकडाऊन नंतर मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याची दिशा ठरवणार असून त्याची सुरुवात कोल्हापुरातून होईल, असंही घाटगे यांनी म्हटलंय. (SamarjitSingh Ghatge warns Thackeray government over Maratha reservation)

मराठा समाज आपला हक्क मागत आहे, भीक नाही. त्यामुळे आता रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही. मराठा समाजाने आता सरकारच्या मानेवर बसून आरक्षण मिळवण्यासाठी सज्ज राहावे, असं आवाहन घाटगे यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाबाबत काल मुंबईत भाजप नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीला समरजितसिंह घाटगेही उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. येत्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी चर्चा आणि भेटीगाठी घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मराठा समाजाच्या आंदोलनाला फूस लावण्याचा प्रयत्न भाजपने कधीही केलेला नाही, तसं असतं तर वर्षभरापूर्वीच आंदोलनं झाली असती, असं सांगत घाटगे यांनी भाजपवर होणार या आरोपांनाही प्रत्युत्तर दिलंय.

फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपची बैठक

मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी भाजपने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली होती. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, नरेंद्र पाटील, श्रीकांत भारतीय, गिरीश महाजन, राणा जगजितसिंह पाटील आणि प्रसाद लाडही उपस्थित होते. या बैठकीत मराठा आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी कायदेतज्ज्ञांची समिती स्थापन करण्यावर चर्चा झाल्याचं कळतंय. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने सुनावणीवेळी काय चुका केल्या, सरकारच्या कोणकोणत्या चुकांमुळे मराठा आरक्षण रद्द झालं, याचा अभ्यास ही समिती करणार असून या समितीच्या निष्कर्षावरून भाजप सरकारची पोलखोल करणार आहे. त्याशिवाय मराठा समाजाच्या आंदोलनातील सहभागाबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळतंय.

सरकारची पोलखोल करण्यासाठी भाजपची कायदेतज्ज्ञांची समिती

मराठा आरक्षणावर अभ्यास करण्यासाठी भाजपने 4 दिवसांपूर्वी एक समिती स्थापन केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, विनायक मेटे, नरेंद्र पाटील आणि श्रीकांत भारतीय यांचा समावेश आहे. 16 मे रोजी या समितीची पहिली बैठक झाली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील चर्चेची माहिती दिली. यावेळी त्यांनी आघाडी सरकारवर सडकून टीका केली. फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. घटनात्मक कार्यवाही करून हे आरक्षण देण्यात आलं होतं. हायकोर्टातही हे आरक्षण टिकवलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयात या आरक्षणाला वर्षभर स्थगिती मिळवू दिली नाही. पण आघाडी सरकारने सत्तेत येताच या आरक्षणाचा खून केला. मुडदा पाडला. माती केली, अशी टीका पाटील यांनी केली.

संबंधित बातम्या :

Maratha Reservation | महाराष्ट्र सरकारला मोठा झटका, मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द

‘सरकार पाण्यात बसलेल्या म्हशीसारखं, ढुसणी दिल्याशिवाय हलत नाही’, मराठा आरक्षणावरुन विनायक मेटेंचं टीकास्त्र

SamarjitSingh Ghatge warns Thackeray government over Maratha reservation

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.