‘ढिम्म सरकारला जागं करण्यासाठी 2 सप्टेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन’, विनायक मेटेंची घोषणा

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ठाकरे सरकार काहीच पावले उचलत नाही. या ढिम्म सरकारला जागं करण्यासाठी 2 सप्टेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिवसंग्राम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे यांनी आज दिलाय. ते जळगावात पत्रकार परिषदेत बोलत होते. विधीमंडळ अंदाज समितीच्या दौऱ्याच्या निमित्ताने आमदार विनायक मेटे हे जळगावात आले होते.

'ढिम्म सरकारला जागं करण्यासाठी 2 सप्टेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन', विनायक मेटेंची घोषणा
विनायक मेटे, अध्यक्ष, शिवसंग्राम संघटना
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 7:02 PM

जळगाव : ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षणाच्या संघर्षाला यश आलं होतं. पण, ठाकरे सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यात अपयशी ठरले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ठाकरे सरकार काहीच पावले उचलत नाही. या ढिम्म सरकारला जागं करण्यासाठी 2 सप्टेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिवसंग्राम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे यांनी आज दिलाय. ते जळगावात पत्रकार परिषदेत बोलत होते. विधीमंडळ अंदाज समितीच्या दौऱ्याच्या निमित्ताने आमदार विनायक मेटे हे जळगावात आले होते. यावेळी त्यांनी अजिंठा शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाबाबत शिवसंग्राम संघटनेची भूमिका मांडली. (Vinayak Mete warns of statewide agitation against state government)

मराठा आरक्षणाच्या बाबतीत कुठलाही निर्णय न घेणारे हे ठाकरे सरकार म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस आहे. या म्हशीला आता टोचण्यासाठी शिवसंग्राम संघटनेसह मराठा समाजाला आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे. ठाकरे सरकारला आम्ही 2 सप्टेंबरपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तोपर्यंत आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही तर, 2 सप्टेंबरला राज्यभर धरणे आंदोलनं, त्यानंतर मेळावे व मोर्चे काढण्यात येतील, असं सांगत मेटे यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय.

‘छत्रपतींच्या स्मारकासाठी 2 वर्षात 2 मिनिटेही वेळ दिला नाही’

छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन शिवसेना सरकारमध्ये आली. मात्र, छत्रपतींच्या स्मारकाबाबत गेल्या 2 वर्षात मुख्यमंत्री ठाकरे यांनी 2 मिनिटंही वेळ दिला नसल्याचा आरोप मेटे यांनी केला. शिवस्मारकाचा विषयही निष्क्रिय मंत्री अशोक चव्हाण यांच्या खात्याकडे असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री यांचे मराठा समाजाबद्दल असलेले प्रेम हे बेगडी व पुतणा मावशीचे असल्याचा आरोप मेटे यांनी केलाय.

अशोक चव्हाण यांना ‘विश्वासघातकी पुरस्कार’ दिला जाणार

राठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन 19 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला 24 जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आला. अशोक चव्हाण यांना विश्वासघातकी पुरस्कार दिला जाणार असल्याचा खोचक टोला शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केलाय. चव्हाण यांनी उपसमितीचे अध्यक्ष असूनही मराठा समाजाच्या विरोधात निर्णय घेतले. चव्हाण यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणीही मेटे यांनी पुन्हा एकदा केली.

102 व्या घटनादुरुस्तीबाबत जो कायदा करण्यात आला आहे, त्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. राज्य सरकार याबाबत काहीच पावलं उचलत नाही. बैठकीत उद्धव ठाकरे सरकारबाबत प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी मोदी सरकारच्या अभिनंदनाचा ठराव पास करण्यात आला. तसंच अजित पवार यांच्या अभिनंदनाचाही ठरावं करण्यात आला. त्यांनी सारथी संस्थेबाबत उत्तम काम केल्याचं मेटे यावेळी म्हणाले.

इतर बातम्या :

पुण्यातील अॅमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याचा महापालिकेचा प्रस्ताव गुंडाळला जाण्याची शक्यता!

Breaking News | आता मृत्यूनंतर क्लास वन अधिकाऱ्याच्या कुटुंबियालाही मिळणार नोकरी, राज्यात अनुकंपा धोरण लागू

Vinayak Mete warns of statewide agitation against state government

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.