पराभवानंतर पाच दिवसांनी पहिली प्रतिक्रिया, पार्थ पवार म्हणतात….
मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पाच दिवसांनी मावळचे उमेदवार पार्थ पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “फक्त एका निवडणुकीसाठी नाही, तर सदैव मी लोकांबरोबर आणि लोकांसाठी कार्यरत राहीन”, अशी प्रतिक्रिया पार्थ यांनी ट्विटरवर दिली आहे. लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी जवळपास 2 लाख मतांनी पराभव केला. या पराभवानंतर तब्बल […]
मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पाच दिवसांनी मावळचे उमेदवार पार्थ पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “फक्त एका निवडणुकीसाठी नाही, तर सदैव मी लोकांबरोबर आणि लोकांसाठी कार्यरत राहीन”, अशी प्रतिक्रिया पार्थ यांनी ट्विटरवर दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी जवळपास 2 लाख मतांनी पराभव केला. या पराभवानंतर तब्बल पाच दिवसांनी पार्थ पवार यांनी ट्विट केले आहे.
या ट्विटमध्ये पार्थ यांनी मावळमधील मतदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल व महाआघाडीतील सर्व सदस्यांनी निवडणुकीत केलेल्या कठोर परिश्रमासाठी मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो, असे लिहिलं आहे. त्याशिवाय फक्त एका निवडणुकीसाठी नाही तर मी सदैव लोकांबरोबर आणि लोकांसाठी कार्यरत राहीन असेही आश्वासनही जनतेला दिले आहे.
मावळमधील मतदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल व महाआघाडीतील सर्व सदस्यांनी निवडणुकीत केलेल्या कठोर परिश्रमासाठी मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो.
फक्त एका निवडणुकीसाठी नाही तर मी सदैव लोकांबरोबर आणि लोकांसाठी कार्यरत राहीन.
— Parth Pawar (@parthajitpawar) May 28, 2019
Ajit Pawar Exclusive : ‘मावळमधील पराभवाची जबाबदारी अजित पवारची’
नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुलगा पार्थ पवारच्या पराभवावर भाष्य केलं. “मावळमध्ये झालेला पराभव मी स्वीकारलेला आहे. त्या पराभवाची सर्वस्वी जबाबदारी अजित पवारची आहे. जनतेने या निवडणुकीत दिलेला कौल स्वीकारला आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे. दुष्काळाची समस्या मोठी आहे, त्याचा मुकाबला कसा करायचा याबाबत आम्ही चर्चा केली” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.
पार्थची जागा जिंकून येणारी नव्हती : शरद पवार
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निकालाबाबत भाष्य केलं होतं. पार्थची जागा आम्ही कधीच जिंकलो नव्हतो, जिंकून येणारी ती जागा नव्हती पण आम्ही प्रयत्न केला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली होती.
मावळचा निकाल
मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी बाजी मारली. पार्थ पवार यांचा 2 लाख 15 हजार 913 मतांनी पराभव झाला.
संबंधित बातम्या
बाळासाहेब विखेंच्या नातवावर गुलाल, पवार साहेबांच्या नातवाबद्दल बोलणार नाही : विखे