Eknath Shinde: परत या, एकनाथ शिंदेंना शिवसेनेतून पहिली भावनिक साद, किशोरी पेडणेकरांना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अश्रू अनावर

एकनाथ शिंदे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. आमच्यासारख्या छोट्या शिवसैनिकांची विनंती आहे, कोणत्याही कूटनीतीचा बाण बनू नका. तुम्ही धनुष्य बाणाचे शिलेदार आहात. तो बाण शान आणि मानात आपलाच राहिला पाहिजे. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाजवळील लाईट नेहमी स्थिर असते. मात्र आज ही लाईटही हलत आहे. याचा अर्थ बाळासाहेबांनाही त्रास होतोय.

Eknath Shinde: परत या, एकनाथ शिंदेंना शिवसेनेतून पहिली भावनिक साद, किशोरी पेडणेकरांना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अश्रू अनावर
परत या, एकनाथ शिंदेंना शिवसेनेतून पहिली भावनिक सादImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 8:10 PM

मुंबई : राज्यात कालपासून राजकीय घमासान सुरु आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आहे. यामुळे शिवसेना चांगलीच पेचात सापडली आहे. मुंबईच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी आज सायंकाळी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. यानंतर महापौरांनी मीडिया संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बंडखोरी आणि शिवसेनेबाबत बोलताना किशोरी पेडणेकरांना अश्रू अनावर झाले. भरल्या डोळ्यांनी महापौरांनी एकनाथ शिंदे यांना ‘परत या’ अशी भावनिक (Emotional) साद घातली आहे. सेनेला कायम संकटांना सामोरं जावं लागतं. कालपासून सुरु असलेला मेलोड्रामा आम्हाला शिवसैनिकांना आत्मक्लेष देणारा आहे. आनंद झाला तरी बाळासाहेबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आता दुःख झाले तरी बाळासाहेबांच्या चरणी नतमस्तक होतोय. सारखे सारखे हे दिवस पहायला लागू नये, अशी आशा पेडणेकर यांनी व्यक्त केली.

धनुष्यबाणाचे शिलेदार आहात, कूटनीतीचा बाण बनू नका

एकनाथ शिंदे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. आमच्यासारख्या छोट्या शिवसैनिकांची विनंती आहे, कोणत्याही कूटनीतीचा बाण बनू नका. तुम्ही धनुष्य बाणाचे शिलेदार आहात. तो बाण शान आणि मानात आपलाच राहिला पाहिजे. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाजवळील लाईट नेहमी स्थिर असते. मात्र आज ही लाईटही हलत आहे. याचा अर्थ बाळासाहेबांनाही त्रास होतोय. शिंदे प्रमुख नेते आहेत, मोठे नेते आहेत. त्यांच्याशी अनेकदा बोलणं होत होतं. घरात काही समस्या असल्यास ती सोडवली जाते, घर जाळत नाही. मला वाटतं शिंदे साहेब समजदार आहेत. ते तोडगा काढण्यासाठी असा प्रस्ताव ठेवणार नाहीत. आपले घर आहे, परत या; असे महापौर म्हणाल्या.

शिवसेनेला मोठं करण्यात शिंदेंच योगदान

सकाळी साहेब बाहेर आले होते, त्यांनी सर्वांसमोर सांगितलं, एकनाथ शिंदे तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय या तुम्ही व्हा. तुम्हाला जी गाजरं दाखवली जातायत ते मुख्यमंत्री पद कधीही देणार नाही आणि दिलं तर मी तुमचं पहिलं स्वागत करेन, मी तुम्हाला पहिला हार, गुच्छ देईन. एवढे मोठे शिवसेनेचे संयमी नेतृत्व जेव्हा तुम्हाला सांगतंय तेव्हा विचार करा. महाराष्ट्राला, शिवसेनेला मोठं करण्यामध्ये आपलं योगदान आहे ते असं फुकट जाऊ देऊ नका, असे भावनिक आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. (Mayor Kishori Pednekar emotional appeal to shivsena leader Eknath Shinde)

हे सुद्धा वाचा

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....