‘उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतलेली भेट राजकीय तडजोडीसाठी’, खासदार उदयनराजेंचा आरोप

या बैठकीवर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जोरदार टीका केलीय. ही भेट केवळ राजकीय तडजोडीसाठीच घेतल्याचं उदनयराजे म्हणाले.

'उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतलेली भेट राजकीय तडजोडीसाठी', खासदार उदयनराजेंचा आरोप
उदयनराजे भोसले, भाजप खासदार
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 3:51 PM

सातारा : राज्यातील मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, जीएसटी परतावा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अशा विविध 12 विषयांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणही उपस्थित होते. ही बैठक जवळपास दीड तास चालली आणि सर्व विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या बैठकीवर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जोरदार टीका केलीय. ही भेट केवळ राजकीय तडजोडीसाठीच घेतल्याचं उदनयराजे म्हणाले. (Udayanraje Bhosle Criticizes CM Uddhav Thackeray over Meeting with PM)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीला जाऊन पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. ही भेट केवळ राजकीय तडजोडीसाठीच झाल्याचा गंभीर आरोप उदयनराजे यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्यापूर्वी अधिवेशन बोलावणं, चर्चा करणं गरजेचं होतं. मुख्यमंत्र्यांनी ते का केलं नाही? असा सवाल उदनयराजे यांनी विचारलाय. हे भेट म्हणून देवाणघेवाणीतून सत्तांतर होण्यासाठीच असल्याची टीकाही त्यांनी केलीय. ते आज सातारा इथं पत्रकारांशी बोलत होते.

‘आम्हाला नेलं असतं तर आनंदच झाला असता’

मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या भेटीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला सोबत नेलं असतं तर आनंदच झाला असता. मात्र, मराठा आरक्षणाच्या संदर्भात ही भेट प्रि-मॅच्यूअर आहे. कारण, न्यायमूर्ती भोसले यांच्या समितीचा अहवाल पाहिला असेल तर त्या समितीने मराठा आरक्षणा पुन्हा मिळवायचं असेल तर काय केलं पाहिजे हे या अहवालात सांगण्यात आलंय. त्या अहवालात राज्याने राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करुन पुढची कार्यवाही करावी लागेल असं सांगितलं आहे. पण ति करण्यात आलेली नाही. पण ठीक आहे, भेट घेतली आहेत तर त्याचा फायदाच होईल, असं फडणवीस म्हणाले.

अर्ध्या मागण्या राज्याशी संबंधित

राज्य सरकारने केंद्राकडे 11 मागण्या मांडल्या आहेत. या मागण्यांची फडणवीसांनी चिरफाड करतानाच काही मागण्यांचं स्वागत केलं. केंद्राकडे 11 मागण्या मांडण्यात आल्या. त्यातील 7-8 मागण्या तर राज्याशीच संबंधित आहे. त्याचा केंद्राशी काहीच संबंध नाही. या सर्व मागण्या केंद्राशी संबंधित असत्या तर बरं झालं असतं. राज्य सरकारने कधीही केंद्राकडे राज्याशी संबंधित मागण्या मांडायच्या नसतात, केंद्राशी संबंधित मागण्याच केंद्राकडे मांडायच्या असतात, असा टोला त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या :

उद्धव ठाकरे, अजित पवार दिल्ली दरबारी मोदींच्या भेटीला, फोटो ट्वीट करत रोहित पवारांचं 2 शब्दांत वर्णन!

मोदी-ठाकरेंची व्यक्तिगत भेट झाली असेल तर स्वागतच, या भेटीचा राज्याला फायदाच होईल: फडणवीस

Udayanraje Bhosle Criticizes CM Uddhav Thackeray over Meeting with PM

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.