उद्धव ठाकरे, अजित पवार दिल्ली दरबारी मोदींच्या भेटीला, फोटो ट्वीट करत रोहित पवारांचं 2 शब्दांत वर्णन!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या भेटीचं दोन शब्दात वर्णन केलंय. लोकशाहीचं सौंदर्य! असं या भेटीबाबत रोहित पवार म्हणालेत.

उद्धव ठाकरे, अजित पवार दिल्ली दरबारी मोदींच्या भेटीला, फोटो ट्वीट करत रोहित पवारांचं 2 शब्दांत वर्णन!
आमदार रोहित पवार
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 3:25 PM

मुंबई : राज्यातील मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, जीएसटी परतावा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अशा विविध 12 विषयांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणही उपस्थित होते. ही बैठक जवळपास दीड तास चालली आणि सर्व विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या भेटीचं दोन शब्दात वर्णन केलंय. लोकशाहीचं सौंदर्य! असं या भेटीबाबत रोहित पवार म्हणालेत. (PM Narendra Modi and CM Uddhav Thackeray meeting is a Beauty of democracy, says Rohit Pawar)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण असे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिनही पक्षाचे नेते उपस्थित होते. तर केंद्रात भाजपचं सरकार आहे. त्यामुळे देश आणि राज्यातील चार मोठ्या राजकीय पक्षाचे प्रमुख आणि मोठे नेते एकाच ठिकाणी, एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी या भेटीचं वर्णन अवघ्या दोन शब्दात केलं आहे. लोकशाहीचं सौंदर्य असं कॅप्शन देत रोहित पवार यांनी ट्विटरवर या भेटीचा एक फोटो शेअर केला आहे.

मोदी-ठाकरे 30 मिनिटे एकांतात चर्चा

पंतप्रधान कार्यालयातून भेटीची वेळ मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण पावणे अकरा वाजताच पंतप्रधान कार्यालयात पोहोचले. त्यानंतर 11 वाजता या तिन्ही नेत्यांची मोदींसोबत बैठक सुरू झाली. तब्बल पावणे दोन तास ही भेट झाली. त्यात मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात एकांतात अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सदन येथे येऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘मोदी आणि आमचे व्यक्तिगत संबंध आहेत. हे सर्वांना माहीत आहे. ही गोष्ट लपलेली नाही आणि लपवण्याची गरज नाही. आज आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही. पण म्हणून आमचं नातं तुटलेलं नाही. मी मोदींना भेटलो म्हणजे काही तरी चूक केलं असं नाही. मी काही नवाब शरीफांना भेटलो नाही. आताही माझ्या सहकाऱ्यांना सांगून मी मोदींना भेटायला जाऊ शकतो’, असं सांगतानाच सत्तेत एकत्र नसलो तरी नातं तुटलं नाही, असं सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलं.

जीएसटी परताव्याबाबत अजितदादांची पंतप्रधानांकडे मागणी

जीएसटी काऊन्सिलमध्ये अनेक वेळा आम्ही सांगितलंय, या अगोदरही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी याच मुद्द्यावरून पत्रव्यवहार केला आहे, आजही पंतप्रधानांच्या कानावर टाकलं, महाराष्ट्राला 24 हजार 306 कोटी रुपयांचा जीएसटी परतावा मिळणे बाकी आहे. कोरोनाचे संकट सगळ्या देशावर आणि राज्यांवर आहे, आम्हाला माहिती आहे. परंतु अशाही काळामध्ये परंतु आर्थिक दिलासा देणे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे राज्याचे पैसे जर लवकरात लवकर मिळाले तर बरं होईल, असं अजित पवार म्हणाले.

संबंधित बातम्या :

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली?, वाचा महत्त्वाचे आणि मोठे 10 मुद्दे

आठ महिन्यानंतरही विधान परिषद सदस्यांची नियुक्ती नाही, मुख्यमंत्र्यांची मोदींकडे राज्यपालांची तक्रार

PM Narendra Modi and CM Uddhav Thackeray meeting is a Beauty of democracy, says Rohit Pawar

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.