Eknath Shinde : दोन खासदार सोडून बाकी सगळे शिवसेनेसोबत, गजानन किर्तीकर यांचा दावा, पुन्हा आकडा बदलला

सर्व खासदार आमच्यासोबत असल्याचा दावा शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी केलाय. यामुळे पुन्हा एकदा संख्याबळावर केलेला दावा कितपत खरा आहे, अशी चर्चा सध्या रंगली आहे. विशेष म्हणजे गजानन किर्तीकर यांनी केलेल्या दाव्यानुसार शिवसेनेकडे नेमके किती खासदार असा प्रश्न उभा राहिलाय.

Eknath Shinde : दोन खासदार सोडून बाकी सगळे शिवसेनेसोबत, गजानन किर्तीकर यांचा दावा, पुन्हा आकडा बदलला
खासदार श्रीकांत शिंदेImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 4:10 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गट, असं चित्र सध्या निर्माण झालंय. एकीकडे सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेची (shivsena) धडपड सुरू झाली आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गट संख्याबळ पूर्ण करून सरकार स्थापनेच्या तयारीत असल्याचं दिसतंय. दरम्यान, खासदार भावना गवळी आणि श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) सोडल्यास बाकी सर्व खासदार आमच्यासोबत असल्याचा दावा शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी केलाय. यामुळे पुन्हा एकदा संख्याबळावर केलेला दावा कितपत खरा आहे, अशी चर्चा सध्या रंगली आहे. विशेष म्हणजे गजानन किर्तीकर यांनी केलेल्या दाव्यानुसार शिवसेनेकडे नेमके किती खासदार असा प्रश्न उभा राहिलाय. तर पुन्हा एकदा संख्याबळाविषयी चर्चा रंगली आहे. कुणाकडे नेमके किती आमदार आणि खासदार, याचं गणित काही सुटेना.

पुन्हा एकदा संख्याबळावर चर्चा

खासदार भावना गवळी आणि श्रीकांत शिंदे सोडल्यास बाकी सर्व खासदार आमच्यासोबत असल्याचा दावा शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी केलाय. यामुळे पुन्हा एकदा संख्याबळावर केलेला दावा कितपत खरा आहे, अशी चर्चा सध्या रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

आकडे आणि दावे

  1. शिंदे यांच्यासोबत जवळपास 47 आमदार आहेत, असा दावा केला जातोय
  2. एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना निलंबित करण्याची मागणी
  3. उद्धव ठाकरे यांच्याकडे 21 आमदार असल्याचा दावा
  4. भावना गवळी, श्रीकांत शिंदे हे दोन्ही शिंदे गटासोबत, किर्तीकर यांचा दावा
  5. शिवसेनेकडून बहूमत सिद्ध करण्याचा दावा
  6. त्यामुळे नेमके कुणाकडे किती आमदार, हे सिद्ध होत नाही
  7. शिवसेना आणि शिंदे गटाकडून आमदारांच्या संख्येत नेहमी बदल होतोय
  8. दोन तृतीयांश संख्या शिंदे गटाकडे असल्याचा दावा देखील त्यांनी यापूर्वी केलाय
  9. संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना मुंबईत येण्याचा इशारा दिलाय
  10. गुवाहाटी ते मुंबई अशी चाललेली रेस कधी संपणार याची उत्सुकता आहे
  11. भाजपकडून सरकार स्थापनेची ऑफर आल्याचा दावाही करण्यात येतोय

कुणाकडे किती खासदार?

  1. श्रीकांत शिंदे, शिंदे गटाकडे
  2. भावना गवळी, शिंदे गटाकडे

फोडाफोडीवर मुख्यमंत्री आक्रमक

‘फोडाफोडीचे राजकारण करत बंडखोर आमदारांकडून शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जातोय. ते म्हणत आहेत की मी शिवसैनिकांच्या पाठीत वार केला. मी बाळासाहेबांचा मुलगा आहे मी पाठीत वार करणार नाही. मी समोर येऊन निर्णय घेणारा आहे. भाजपने कोणत्याही परिस्थितीत मला एकटं करायंचं ठरवलं आहे. आणि त्याला तुम्ही बळी पडत आहात. आज जे निवडूण आलेत त्यांना फोडले जात आहे. मात्र निवडून देणाऱ्यांना विकत घेऊ शकत नाही. तुम्ही त्यांना फोडू शकत नाही. आता जे तुमच्या सोबत येत असतील तर घेऊन जा, द्या त्यांना पैसा नाहीतर धमकी. पण तुम्ही निवडून देणाऱ्यांना कसं धमकावणार? त्यांना कसं विकत घेणार? त्यांना कसं फोडणार?,’ असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलाय.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.