AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदेगटात प्रवेशाची चर्चा, मिलिंद नार्वेकर यांची एक कृती सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते…

मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा आहे. नार्वेकर यांनी आपल्या कृतीतून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. वाचा...

शिंदेगटात प्रवेशाची चर्चा, मिलिंद नार्वेकर यांची एक कृती सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते...
| Updated on: Oct 03, 2022 | 12:04 PM
Share

दिनेश दुखंडे, TV9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अत्यंत निकटवर्तीय शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा आहे. ते लवकरच शिंदेगटात प्रवेश करतील अशी चर्चा होत असतानाच नार्वेकर यांनी आपल्या कृतीतून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. येणाऱ्या काळात ते कुणासोबत असतील याचा फोटो टीझरच समोर आलाय असं आपण म्हणू शकतो.

मिलिंद नार्वेकर हे लवकरच शिंदे गटात जाणार असल्याच्या बातम्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात धुमाकूळ घातला आहेत. अशात काल रात्री नार्वेकर यांनी शिवाजी पार्कात जाऊन शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या तयारीची पाहणी केली.

milind narvekar

काल रात्री 10:30 वाजता मिलिंद नार्वेकर हे शिवाजी पार्कात आले होते. दसरा मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला. पाहणीनंतर उद्धव ठाकरे यांना फोन करून त्यांनी एकूण तयारीचा तपशील दिला. तयारी कुठपर्यंत आली आहे, याची माहिती दिली.

Narvekar

तसंच नार्वेकर यांनी देवीचं दर्शनही घेतलं. शिवाजी पार्कामध्ये बंगाल क्लब यंदा नवरात्रोत्सव साजरा करत आहे.नार्वेकर यांनी या देवीचं दर्शन घेतलं.

milind narvekar

शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिलिंद नार्वेकर लवकरच शिंदे गटात येणार असल्याचं म्हटलं. त्यांच्या या विधानाने सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली. त्यांनी या सगळ्या चर्चांना आपल्या कृतीतून उत्तर दिलं आहे.

दसरा मेळावा

यंदाचा दसरा मेळावा विशेष आहे. शिंदेगटाच्या बंडानंतरचा हा पहिला दसरा मेळावा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे शिंदेगटासह भाजपवर टीका करणार हे पाहणं महत्वाचं असेल.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.