AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी अपक्ष आमदाराला विशेष विमानाने मुंबईत आणलं, आता थेट शिवसेनेत प्रवेश, मिलिंद नार्वेकरांनी करुन दाखवलं

सरकार स्थापनेच्या वेळी शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी गडाखांना विशेष विमानाने मुंबईत आणलं होतं.

आधी अपक्ष आमदाराला विशेष विमानाने मुंबईत आणलं, आता थेट शिवसेनेत प्रवेश, मिलिंद नार्वेकरांनी करुन दाखवलं
Follow us
| Updated on: Aug 11, 2020 | 3:40 PM

अहमदनगर : अहमदनगरमधील अपक्ष आमदार आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी ‘मातोश्री’वर शिवबंधन बांधलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गडाख यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना शंकरराव गडाख यांना विशेष विमानाने मुंबईत आणणारे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही यावेळी उपस्थित होते. (Milind Narvekar the man responsible for Minister Shankarrao Gadakh entering Shivsena)

शिवसेनेचे‌ माजी आमदार आणि उपनेते अनिल भैय्या राठोड यांच्या निधनानंतर अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेत पोकळी निर्माण झाली होती. मात्र गडाखांच्या प्रवेशाने पक्षाला जिल्ह्यात नवसंजीवनी मिळणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत नगरमध्ये शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नव्हता. गडाख यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केल्याने नगर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढणार आहे.

शंकरराव गडाख यांनी अहमदनगरमधील नेवासा विधानसभा मतदारसंघातून ‘क्रांतिकारी शेतकरी पक्षा’कडून निवडणूक लढवली होती. सरकार स्थापनेच्या वेळी गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी त्यावेळी केवळ ‘अपक्ष आमदार’ असलेल्या गडाखांना विशेष विमानाने मुंबईत आणलं होतं.

हेही वाचा : निलेश लंकेंनी राष्ट्रवादीत आणलं, मिलिंद नार्वेकरांनी ‘करुन दाखवलं’, पारनेरच्या नगरसेवकांची घरवापसी

शंकरराव गडाख यांनी आकड्यांच्या खेळात शिवसेनेला साथ दिल्याची जाण पक्षाने ठेवली होती. मंत्रिमंडळ स्थापन करताना गडाख यांच्याकडे मृदा आणि जलसंधारण मंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली होती.

(Milind Narvekar the man responsible for Minister Shankarrao Gadakh entering Shivsena)

कोण आहेत शंकरराव गडाख?

शंकरराव गडाख हे अहमदनगरचे माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे पुत्र. नेवासा मतदारसंघातून ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. याआधी 2009 मध्येही ते आमदारपदी निवडून आले होते. सध्या ते उस्मानाबादचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री आहेत. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, मुळा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी आतापर्यंत भूषवली आहेत. शंकरराव गडाख हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात.

संबंधित बातम्या :

अनिल भैय्यांची पोकळी भरुन काढणार, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेचं संख्याबळ 61 वर, मिलिंद नार्वेकरांसोबत अपक्ष आमदार विशेष विमानाने मुंबईत!

(Milind Narvekar the man responsible for Minister Shankarrao Gadakh entering Shivsena)

पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने
पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने.
शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात
शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी.
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.