Eknath Shinde : कशाच्या जोरावर भाजप हे राजकारण करतंय? इम्तियाज जलील यांनी दोन वाक्यात सांगितली भाजपाची रणनिती
महाविकास आघाडीची स्थापना होतानाच शिवसनेने काय परस्थिती ओढावणार याचा अभ्यास करणे गरजेचे होते. याची कल्पना काही राजकीय पक्षांना होती मात्र, राजकीय स्वार्थ साधण्यासाठी त्यांनी शिवसेनेचे नुकसान केल्याचे सांगच जलील यांनी अप्रत्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टिका केली आहे.
मुंबई : दोन आठवड्याच्या कालावधीत राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर (Maharashtra) राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने (Politics) बदलली आहेत. यातच (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाजूला होत राजकीय भूकंप घडवून आणला आहे. त्यामुळे भाजपची रणनिती साध्य होणार का असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र, भाजप काहीही करु शकते. केंद्रात सत्ता असल्यामुळे राज्यातील सत्तेसाठी कोणत्याही टोकाला जातील असा घणाघात एमआयएमचे खा. इम्तियाज जलील केला आहे. सत्तेसाठी कायपण हेच भाजपाचे धोऱण आहे. शिवाय राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. शिवाय साम, दाम आणि दंड या जोरावर ते काहीही करु शकतात असेही इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे.
महाविकास आघाडी स्थापनेत सेनेलाच फटका
महाविकास आघाडीची स्थापना होतानाच शिवसनेने काय परस्थिती ओढावणार याचा अभ्यास करणे गरजेचे होते. याची कल्पना काही राजकीय पक्षांना होती मात्र, राजकीय स्वार्थ साधण्यासाठी त्यांनी शिवसेनेचे नुकसान केल्याचे सांगच जलील यांनी अप्रत्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टिका केली आहे. बदलत्या राजकीय परस्थितीचा सर्वाधिक फटका हा शिवसेनेलाच बसणार असल्याचेही ते म्हणाले. पण राजकराणात हुकमशाहीचा उद्य होत असल्याचेही सांगच भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
देशातही भाजपाची हीच रणनिती
राजकीय स्वार्थासाठी कुठल्याही स्थराला जाण्याची भाजपाची तयारी आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर यापूर्वी मध्यप्रदेशातही त्यांनी हेच केले आहे. जिथे मिळाले नाह तेथून हिसकावून घ्यायची त्यांची सवय आहे. शिवाय हे सर्व जनतेला ज्ञात आहे. आता जरी राजकीय वाटचालीसाठी ते फायदा करुन घेत असले तरी भविष्यात या सर्वाची भरपाई त्यांना करावी लागणारच आहे. सध्याची रणनिती चुकीची असली तरी त्यांच्या दृष्टीकोनातून सर्वकाही बरोबर आहे. पण जनता हे सर्व उघड्या डोळ्याने बघत असल्याची तरी जाणीव त्यांनी ठेवणे गरजेचे असल्याचे जलील यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादीने स्वार्थ साधला, सेनेला फटका बसला
महाविकास आघाडीच्या स्थापनेमुळे सर्वात मोठे नुकसान हे शिवसेनेचे झाले आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला राजकीय स्वार्थ साधला आहे. सध्या जी परस्थिती राज्य सरकारमध्ये निर्माण झाली आहे त्याचा फायदा हा भाजपाकडून घेतला जात आहे. यासाठी कोणता मार्ग हे महत्वाचे नाही तर सत्ता केंद्राचा उद्देश साध्य करण्यासाठी कायपण हेच भाजपाचे धोरण असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे.