राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजाराला सुरुवात? एमआयएमच्या आमदारांचा मोठा दावा, भाजपकडून ऑफर?

एमआयएमचे धुळे शहर विधानसभा मतदारसंघ आमदार फारुख शाह यांनी खळबळजनक दावा केला आहे. भाजपकडून घोडेबाजार सुरू झाल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच आपल्याला ऑफरही आल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजाराला सुरुवात? एमआयएमच्या आमदारांचा मोठा दावा, भाजपकडून ऑफर?
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 6:59 PM

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक (Rajyasabha Election) होतेय. पण सध्याचं विधिमंडळातील संख्याबळ पाहता सहाव्या जागेसाठी घोडेबाजार होण्याची चिन्ह आहेत. “आम्ही घोडेबाजार करणार नाही”, असा दावा महाविकास आघाडी आणि भाजप दोघांकडून केला जातोय. पण अश्यात एमआयएमचे धुळे शहर विधानसभा मतदारसंघ आमदार फारुख शाह (Farooq Shah) यांनी खळबळजनक दावा केला आहे. भाजपकडून (BJP) घोडेबाजार सुरू झाल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच आपल्याला ऑफरही आल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

भाजपची ऑफर, एमआयएमचा दावा

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी घोडेबाजार सुरू असल्याचा दावा एमआयएमचे आमदार फारुख शाह यांनी केला आहे. आपल्याला महाविकास आघाडी आणि भाजप दोघांकडूनही ऑफर असल्याचं फारुख शाह यांनी म्हटलंय. “काहीजणांचे फोन येत आहेत, तर काहीजण भेटायला येत आहेत. पण जोपर्यंत आमचे अध्यक्ष आदेश देत नाही तोवर आम्ही काहीही भूमिका घेणार नाही”, असं त्यांनी सांगितलं आहे.

‘…तर आघाडीला पाठिंबा देऊ’

“भाजपला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही. जर आमच्या अध्यक्षांनी ठरवलं की आम्हाला महाविकास आघाडीला मतदान करायचंय तर त्याप्रमाणे आपण मतदान करू. पण तसे आदेश आणखी देण्यात आलेले नाहीत”, असं फारुख शाह यांनी म्हटलंय. शिवाय “सरकार स्थापनेच्या वेळीदेखील आम्हाला ऑफर आली होती पण पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी तेव्हा तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे आम्ही तटस्थ राहिलो”, असं त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

‘महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार’

फारुख शाह यांनी सहावी जागा कुणाची असणार यावर भाष्य केलंय. “भाजपने कितीही प्रयत्न केले तरी त्यांची तिसरी जागा निवडून येऊ शकत नाही. सहावी जागा ही महाविकास आघाडीचीच असेल”, असंही शाह म्हणाले आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.