सरकारवर विश्वास नसेल तर मराठा संघटनांनी त्यांचा वकील लावावा : अशोक चव्हाण
जर सरकारवर विश्वास नसेल तर त्यांनी त्यांचा वकील जरुर लावावा," असे अशोक चव्हाण म्हणाले. (Ashok Chavan On Maratha Reservation Hearing)
जालना : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation Hearing) काही जण राजकारण करत आहेत. जर त्यांना सरकार विश्वास नसेल तर त्यांनी त्यांचा वकील जरुर लावावा, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना अशोक चव्हाणांनी ही प्रतिक्रिया दिली. (Ashok Chavan On Maratha Reservation Hearing)
न्यायालयात वकील बाजू मांडण्यासाठी तयार आहेत पण सरकारचा प्लॅन तयार नाही, या आरोपांवर अशोक चव्हाणांना विचारले असता ते म्हणाले, “हे असं अजिबात नाही. यात काही जण राजकारण करत आहेत. जे कोणी असं बोलतं आहेत, त्यांनी स्वत:चा वकील लावावा. जर सरकारवर विश्वास नसेल तर त्यांनी त्यांचा वकील जरुर लावावा,” असे अशोक चव्हाण म्हणाले.
“सर्वोच्च न्यायलयात आज मराठा आरक्षण हा विषय सुनावणीसाठी येणार आहे. सरकारची हीच भूमिका आहे, ज्या घटनापीठाने मागील निर्णय हा आरक्षणासंदर्भातील हा घटनापिठाकडे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजची सुनावणी ही या पिठाकडे न घेता ती घटनापिठाकडे व्हावी, अशाप्रकराची आमची भूमिका आहे. तशीच भूमिका आज सर्वोच्च न्यायालयात घेतली जाईल. हा विषय घटनापिठाकडे जावा, असाच युक्तीवाद केला जाईल,” अशी आमची भूमिका आहे, असेही अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं.
“मराठा आरक्षणाची स्थगिती उठवण्याची जी काही सुनावणी आहे ती या पिठाकडे नाही. घटनापिठालाच याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे,” असेही अशोक चव्हाण म्हणाले.
मराठा आरक्षणावर आज सुनावणी
मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर आज (27 ऑक्टोबर) पुन्हा सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. स्थगिती उठविण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि विनोद पाटील यांच्या विनंती याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. न्यायाधीश नागेश्वर राव यांच्या खंडपीठात यावर सुनावणी होणार आहे.
न्यायमूर्ती एल.एन.राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या खंडपीठापुढे मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. यावेळी सरकारकडून वकील मुकूल रोहतगी, अभिषेक मनू सिंगवी, कपिल सिब्बल बाजू मांडतील. तर विनोद पाटील यांच्या वतीने वकील संदीप देशमुख बाजू मांडतील. तर राज्य सरकारकडून वकिल पी एस पटवलीया बाजू मांडणार आहेत. (Ashok Chavan On Maratha Reservation Hearing)
संबंधित बातम्या :
Maratha Reservation LIVE | मराठा आरक्षण सुनावणी घटनापीठाकडे व्हावी : अशोक चव्हाण