चंद्रकांत पाटील यांच्या डोक्यावर परिणाम, सत्ता गेल्याने त्यांची अवस्था मनोरुग्णासारखी, हसन मुश्रीफ यांचा घणाघात

महाराष्ट्रातील सत्ता गेल्याने चंद्रकांत पाटील ते असे वक्तव्य करत आहेत, अशी टीका मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. (Hasan mushrif Criticizes Chandrakant Patil)

चंद्रकांत पाटील यांच्या डोक्यावर परिणाम, सत्ता गेल्याने त्यांची अवस्था मनोरुग्णासारखी, हसन मुश्रीफ यांचा घणाघात
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 10:44 AM

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अवस्था मानसिक संतुलन ढासळलेल्या मनोरुग्णासारखी झाली आहे. महाराष्ट्रातील सत्ता गेल्याने चंद्रकांत पाटील ते असे वक्तव्य करत आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं खुळ्यासारखं बडबडत आहेत, अशी घणाघाती टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. (Hasan mushrif Criticizes Chandrakant Patil)

काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर खोचक टीका केली होती. त्या टीकेवरुन मुश्रीफ यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला.

बहुजनांचे नेतृत्व म्हणून शरद पवार यांनी नवा महाराष्ट्र घडविला आहे. त्यांनी लोकसभेच्या 10 ते 12, विधानसभेच्या दहा ते बारा निवडणुका जिंकल्या आहेत. देशाचे कृषी मंत्री, संरक्षण मंत्री या पदांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान निश्चितच मोठे आहे. राज्यात आणि केंद्रातही विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी काम केले. तसेच ते एकदाही पराभूत झालेले नाहीत.

चंद्रकांत पाटील यांनी काहीही न करता त्यांना एकदा नव्हे दोनदा केवढी मोठी संधी मिळाली होती. ते किती भाग्यवान आहेत. पण या सगळ्याचा राज्याला तर सोडाच कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा काहीही उपयोग झालेला नाही, असा टोलाही हसन मुश्रीफ यांनी लगावला.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते? 

राजकारणात येण्यापूर्वी शरद पवार मला खूप मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर ते खूप छोटे नेते असल्याचं दिसून आलं. त्यांचा अभ्यास नसतो, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र अभ्यासू नेते आहेत, असं पाटील म्हणाले होते. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं.

यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यावर सारवासारव करत केलेल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं, “मला पवार साहेबांबद्दल चुकीचं बोलायचं नव्हतं. पण तुम्ही मोदींवर, शाहांवर बोलता ते चालतं. देवेंद्र फडणवीस यांना टरबूज्या म्हणता ते चालतं, मला चंपा म्हणतात ते चालतं का?” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. (Hasan mushrif Criticizes Chandrakant Patil)

संबंधित बातम्या : 

भाजपने ठरवलं तर महिला मुख्यमंत्री करायला वेळ लागणार नाही: चंद्रकांत पाटील

शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये; अमोल कोल्हेंची चंद्रकांतदादांवर टीका

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.