Sunil Kedar | दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण, ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार

महाराष्ट्रातील दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. (Minister Sunil Kedar Corona Positive)

Sunil Kedar | दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण, ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार
Follow us
| Updated on: Sep 03, 2020 | 8:41 PM

मुंबई : महाराष्ट्रातील दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. (Minister Sunil Kedar Corona Positive)

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते सुनील केदार यांना गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षण जाणवतं होती. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लक्षणं असल्याने त्यांना  मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल केलं आहे.

नुकतंच त्यांनी मुंबईतील गोरेगावच्या शासकीय महानंद डेअरी येथे भेट दिली होती. यावेळी त्यांनी संचालक मंडळ आणि सदस्य यांच्याशी चर्चा केली. महानंदाच्या संपूर्ण प्रकल्पाची पाहणी केली. महानंदच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची संपूर्ण माहिती घेतली होती.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोना संकटात अनेक लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. मात्र, आता लोकप्रतिनिधींनादेखील कोरोनाचा संसर्ग होत असल्याचं समोर येत आहे.

राज्यातील मंत्री, आमदारांना कोरोनाची लागण

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि मत्स्योद्योग मंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची बाधा झाली होती. हे सर्व मंत्री कोरोनामुक्त झाले आहेत.

पुण्यातील दौंडचे भाजप आमदार राहुल कुल, पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार महेश लांडगे आणि त्यांची पत्नी, हडपसरमधील भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर, मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन, नाशिकमधील राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह कुटुंबातील नऊ जणांना कोरोनाची लागण झाली होती. तर माजी महापौर आणि विद्यमान भाजप आमदार मुक्ता टिळक आणि त्यांच्या मातोश्री यांनाही कोरोना झाला होता. (Minister Sunil Kedar Corona Positive)

संबंधित बातम्या : 

पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरांनी प्रश्न उपस्थित करणे लज्जास्पद, सुनील केदार यांचा हल्लाबोल

शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांना कोरोना, अतिदक्षता विभागात उपचार

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.