मिरा भाईंदरमध्ये भाजपला धक्का, अपक्ष आमदार गीता जैन यांच्या हाती शिवबंधन
बदलत्या राजकीय परिस्थितीत गीता जैन, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यास सत्तेचं पारडं उलटं फिरण्याचीही शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत
मिरा भाईंदर : मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गीता जैन यांनी ‘मातोश्री’वर शिवबंधन हाती बांधले. आमदार गीता जैन यांनी एकट्यानेच शिवसेनेत प्रवेश केला, मात्र भाजपचे नगरसेवक मॉरिस रॉड्रिक्स, अश्विन कसोदरिया, परशुराम म्हात्रे आणि विजय राव यांच्यास जवळपास 10 नगरसेवक गीता जैन यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Mira Bhainder Independent MLA Geeta Jain to join Shivsena Live Update)
[svt-event title=”गीता जैन यांच्या हाती शिवबंधन” date=”24/10/2020,12:32PM” class=”svt-cd-green” ]
आमदार गीता जैन मातोश्रीवर दाखल, ‘मातोश्री’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मीरा भाईंदरच्या भाजप समर्थक आमदार गीता जैन यांचा शिवसेनेत प्रवेश #GeetaJain
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 24, 2020
[/svt-event]
गीता जैन विरुद्ध नरेंद्र मेहता वाद
भाजपच्या सहयोगी राहिलेल्या गीता जैन यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा जैन यांनी पराभव केला होता. मीरा-भाईंदर शहरामध्ये भाजपात दोन गट पडले आहेत. यामध्ये एक गट विद्यमान आमदार गीता जैन यांचा, तर दुसरा माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा आहे. जैन आणि मेहता यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे.
मिरा भाईंदर महापालिकेत आता भाजपची सत्ता आहे. भाजपचेच महापौर असून पक्षाचे 61 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे 22, तर काँग्रेसचे 12 नगरसेवक आहेत. पालिकेत सत्तेसाठी 48 हा बहुमताचा आकडा आहे. भाजपचे 61 नगरसेवक असल्यामुळे दहा नगरसेवक आमदार गीता जैन यांच्यासोबत गेले, तरीही भाजपच्या सत्तेवर परिणाम होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जाते.
सध्या मीरा-भाईंदर महापालिकेत भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थक ज्योती हसनाळे भाजपच्या महापौर आहेत. यानंतरच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत गीता जैन, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यास सत्तेचं पारडं उलटं फिरण्याचीही शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. मिरा भाईंदरमध्ये जैन समाजाची संख्या जास्त असल्याने येणाऱ्या काळात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. (Mira Bhainder Independent MLA Geeta Jain to join Shivsena Live Update)
गीता जैन यांची नाराजी
अपक्ष निवडणूक जिंकल्यावर गीता जैन यांनी भाजपला समर्थन दिलं होतं. मिरा भाईंदरची कमान भाजप आपल्या हातात देईल, असा विश्वास गीता जैन यांना होता. मात्र स्थानिक भाजप कुठल्याही कार्यक्रमात आमंत्रण देत नसल्याच्या कारणावरुन गीता जैन नाराज होत्या. त्यानंतर त्यांनी थेट शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
VIDEO : टॉप 9 न्यूज | 24 October 2020 | 9 AMhttps://t.co/h0HVpY3jFB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 24, 2020
संबंधित बातम्या :
खडसेंनंतर भाजपला मीरा-भाईंदरमध्येही मोठ्या झटक्याची शक्यता, बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार?
मिरा भाईंदरच्या ‘कोरोना’ग्रस्त आमदार गीता जैन यांचे बर्थडे सेलिब्रेशन
(Mira Bhainder Independent MLA Geeta Jain to join Shivsena Live Update)