AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं चारओळीचं ट्विट, नव्या चर्चांना उधाण; काय आहे ट्विट?

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामुळे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचं सांगितलं जात आहे. फडणवीस यांनी पहिल्यांदाच असं ट्विट केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं चारओळीचं ट्विट, नव्या चर्चांना उधाण; काय आहे ट्विट?
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 12:23 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. अजित पवार यांचं नॉटरिचेबल होणं, भाजपच्या बाजूने विधानं करणं आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करणं… या सर्व गोष्टी लागोपाठ घडल्याने अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना अधिकच बळकटी मिळाली. मात्र, काल अजित पवार यांनी मीडियासमोर येऊन या अफवा असल्याचं सांगितलं. शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे या चर्चांचा धुरळा बसलेला असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटने चर्चांचा धुरळा उठला आहे. फडणवीस यांच्या ट्विटमुळे सरकार राहणार की जाणार? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

हे सुद्धा वाचा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन फोटोंसह हे ट्विट केलं आहे. मिशन नो पेंडेन्सी असा हॅशटॅग देऊन त्यांनी हे ट्विट केलं आहे. कार्यालयीन कामकाजातील प्रलंबित कामे मार्गी लावताना असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या टेबलवर फायलींचा मोठा ढिग दिसत आहे. या फायलींवर फडणवीस सह्या करताना दिसत आहेत. फडणवीस अत्यंत प्रसन्न मुद्रेत आहेत. दुसऱ्या फोटोत त्यांचा चेहरा गंभीर दिसत आहे. फडणवीस यांनी कामाचा निपटारा करत असल्याचं ट्विट केल्याने अनेकतर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

सरकार जाणार?

फडणवीस यांच्या ट्विटचे राजकीय अर्थ लावले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी पूर्ण झाली आहे. राज्याच्या सत्तासंघर्षावर केव्हाही निकाल येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात हा निकाल जाण्याची सर्वात अधिक शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या ट्विटला अधिक महत्त्व आलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत जाणार नसल्याचं विधान केलं आहे. त्यानंतर अवघ्या काही तासात फडणवीस यांनी हे ट्विट केलं आहे. अजितदादा भाजपसोबत येणार नाही. त्यामुळे कोर्टाचा निकाल विरोधात गेला तर सरकार राहणार नाही. त्यामुळे फडणवीस फायली मार्गी लावत असल्याचं सांगितलं जात आहे.

पहिल्यांदाच ट्विट

देवेंद्र फडणवीस या पूर्वी मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांच्याकडे अनेक खात्यांचा भार होता. आता ते उपमुख्यमंत्री आहेत. राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार येऊन आठ महिने झाले आहेत. या आठ महिन्यात फडणवीस यांनी कधीच ऑफिसच्या कामाचा निपटारा करत असल्याचं ट्विट केलं नव्हतं. तसेच मुख्यमंत्री असतानाही त्यांनी असं ट्विट केलं नव्हतं. फडणवीस यांनी पहिल्यांदाच हे ट्विट केलं आहे. त्यामुळे त्यांना नेमके काय संकेत द्यायचे आहेत? फडणवीस यांना सरकार जाणार हे कळून चुकलंय का? अशी चर्चाही या निमित्ताने रंगली आहे.

भाजपने शक्यता फेटाळली

सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि सर्वोच्च न्यायालयाचा येणारा निकाल या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. रात्री उशिरापर्यंत ते फाईल क्लिअर करत होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असली तरी भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फडणवीस यांच्याकडे सहा सहा विभागांची जबाबदारी आहे. कोणत्याही विभागाची कामे प्रलंबित राहू नये हा फडणवीस यांचा स्वभाव आहे. जनसेवेच्या फाईल पेंडिंग नसाव्यात. त्यामुळे फडणवीस फाईल क्लिअर करत आहेत. त्यामुळे फडणवीस उशिरापर्यंत काम करत आहेत. त्याचा कोर्टाच्या निकालाशी काहीच संबंध नाही. फाईल उशिरापर्यंत क्लिअर करत असल्याने सरकार जाईल, असा अर्थ काढणं योग्य नाही, असं भाजप सूत्रांनी म्हटलं आहे.

मात्र,कोर्टाचा निकाल आणि राज्यातील राजकारण पाहता फडणीस उशिरापर्यंत काम करत तर नाही ना अशी चर्चा रंगली आहे. पण भाजपने ही शक्यता फेटाळून लावली आहे. सहा विभागाचे काम फडणवीस यांच्याकडे असल्याने त्यांनी उशिरापर्यंत काम केल्याचं भाजपकडून सांगितलं जात आहे.

भारतावरील हल्ला पाकिस्तानला भोवला, भारताचा करारा जवाब
भारतावरील हल्ला पाकिस्तानला भोवला, भारताचा करारा जवाब.
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.