ठाकरे सरकारनेच ओबींसीच्या राजकीय आरक्षणाचा खून केला, आशिष शेलारांचा हल्लाबोल
ठाकरे सरकारने काय केले तर इंपेरिकल डाटा केंद्र सरकारने द्यावा, जनगणननेची आकडेवारी केंद्र सरकारने द्यावी, साथीच्या काळात आम्हाला इंपेरिकल डाटा गोळा करणे शक्य नाही, असं वारंवार सांगत राहिले, अशी खोचक टीका शेलार यांनी केलीय.
मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) जोरदार हल्ले सुरु झालेत. ‘ठाकरे सरकारने दृष्टीआहिन, बुध्दीाहिन आणि दिशाहिन भूमिकेने ओबींसींच्या राजकीय आरक्षणाचा खून केला’, असा गंभीर आरोप भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलाय. तसंच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण जात असताना मंत्री म्हणून छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार मंत्रीमंडळात कसे राहू शकतात?, असा खोचक सवालही शेलार यांनी केलाय.
ठाकरे सरकारच्या हेकेखोरपणामुळे स्थाानिक स्वाराज्य संस्थांमधील ओबीसींच्या 27 टक्केच आरक्षणाचा खून झाला. ज्या पद्धतीने 2019ला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निवडा देताना ट्रिपल टेस्टमध्ये खरा ठरणारा इंपेरिकल डाटा गोळा करा, असा आदेश दिला होता. मात्र, अहंकार आणि हेकेखोरपणा या सरकारने सोडला नाही. त्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 2019 ला सांगितले की, मागासवर्ग आयोग नेमा, इंपेरिकल डाटा गोळा करा, आरक्षणासाठी समथर्न कार्यपध्दीती करा. पण ठाकरे सरकारने काय केले तर इंपेरिकल डाटा केंद्र सरकारने द्यावा, जनगणननेची आकडेवारी केंद्र सरकारने द्यावी, साथीच्या काळात आम्हाला इंपेरिकल डाटा गोळा करणे शक्य नाही, असं वारंवार सांगत राहिले, अशी खोचक टीका शेलार यांनी केलीय.
‘आंब्याच्या झाडासमोर उभे राहुन चिंच मागण्याचं काम’
ओबीसी समाजाचे मागासलेपण सिध्द करणारी इंपेरिकल डाटा आणि जनगणनेची आकडेवारी यामध्ये फरक आहे. पण आंब्याच्या झाडासमोर उभे राहुन चिंच द्या, अशी मागणी करण्यारसारखं काम या सरकारनं केलं. छगन भुजबळ, विजय वड्डेट्टीवार, नाना पटोले यांनी एवढे दिवस हेच केलं. स्वत:चा नाकर्तेपणा दुसऱ्यावर आरोप करून झाकला जात नाही, असा टोलाही शेलार यांनी लगवाला आहे.
आमदार श्री. आशीष शेलार यांची पत्रकार परिषद. https://t.co/qhUU14Ae9O
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 16, 2021
करण जोहरच्या ‘त्या’ पार्टीत सरकारचा मंत्री होता का?
बॉलिवूडचा दिग्दर्शक करण जोहर यांच्या पार्टीत काही कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. करण जोहरच्या पार्टीत ठाकरे सरकारचा कोणी मंत्री होता का? असेल तर त्यांनी पुढे यावे. लोकांच्या आरोग्याशी खेळू नये, अशी शंका आशिष शेलार यांनी उपस्थित केली आहे.
करण जोहरच्या पार्टीवरून संभ्रमाचे वातावरण दिसते निर्माण झाले आहे. या पार्टीत राज्य शासनातील कोणी मंत्री होता का?, हा संशय बळावयाचे नसेल तर त्या इमातीचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करावे. जी माहिती समोर आली त्यामध्ये त्या पार्टीमधील अन्य लोकांनी पालिकेकडून टेस्ट केलेल्या नाहीत. त्यांनी हरकिशनदास रूग्णालयात चाचण्या केल्या आहेत, असं सांगतानाच या पार्टीत किती लोक होती?, अशी शंका निर्माण होत आहे. त्या पार्टीमध्ये राज्य सरकारमधील कुणी मंत्री होता का? पालिकेने सीसीटीव्ही फुटेज जाहीर करावे. जर कुणी मंत्री असेल तर त्याने पुढे यावे. कुणी मंत्री त्या पार्टीला होतं का त्याची स्पष्टता असावी, जन आरोग्याची खेळू नये, असे शेलार यांनी म्हटलं आहे.
इतर बातम्या :