Manisha Kayande : आगोदर डोंबाऱ्याच्या खेळातील माकड म्हणून हिणवले अन् थेट भूमिकेवरच प्रश्नचिन्ह, कायंदेंची मनसेवर सडकून टीका
गरज निर्माण होईल अशी मनसेने आतापर्यंत आपली भूमिका बदलेली आहे. ही बाब आता सर्वसामान्यांच्याही लक्षात आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी हिंदूत्व मुद्द्याला हात घातला होता. हे सर्व कशासाठी ते आता लक्षात येत आहे. भाजप-मनसे युतीबाबतच्या घडामोडी ह्या अचानक नाहीतर खूप पूर्वीपासूनच्या असल्याची टीकाही कायंदे यांनी केली आहे.
मुंबई : शिवसेना (MLA Manisha Kayande) आमदार मनीषा कायंदे यांनी आतापर्यंत (MNS Party) मनसेने घेतलेल्या भूमिकेवर सडकून टीका केलेली आहे. यापूर्वीही औरंगाबाद येथे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहिर सभा पार पडल्यानंतर त्यांनी हे डोंबाऱ्याच्या खेळातील माकड असून या माकडाला नाचवणारे डोंबारी कोण? हे सर्वांना माहिती आहे असे म्हणत जहरी टीका केली होती. तर आता (BJP-MNS) भाजप-मनसे युतीची चर्चा रंगली असून सत्तेसाठी किती ही लाचारी असा टोला त्यांनी मनसेला लगावला आहे. तर आता खऱ्या अर्थाने हिंदूत्वाचा मुखवटा कशासाठी घातला हे देखील सर्वसामान्यांच्या लक्षात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भाजप-मनसे युतीबाबत त्यांनी दोन्ही पक्षावर सडकून टीका केली असून हे सर्व सत्तेसाठी चालले असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.
हिंदूत्वाचा वापर अन् उद्देश वेगळाच
गरज निर्माण होईल अशी मनसेने आतापर्यंत आपली भूमिका बदलेली आहे. ही बाब आता सर्वसामान्यांच्याही लक्षात आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी हिंदूत्व मुद्द्याला हात घातला होता. हे सर्व कशासाठी ते आता लक्षात येत आहे. भाजप-मनसे युतीबाबतच्या घडामोडी ह्या अचानक नाहीतर खूप पूर्वीपासूनच्या असल्याची टीकाही कायंदे यांनी केली आहे. हिंदूत्वाचा मुखवटा कशासाठी घेतला होता हे गेल्या दोन दिवसांच्या हालचालीवरुन निदर्शनास येत असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.
हा तर पोरखेळ, मेळावा तर होणारच
शिंदे सरकार सत्तेत आले पण सर्वकाही शिवसेनेसारखे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत आमच्या शाखेसमोर त्यांनी कार्यलये उभी केली, आता शिवसेनेचा दसरा मेळाव्याला गेल्या 56 वर्षांची परंपरा आहे. असे असतानाही आमचाही मेळावा ही भूमिका म्हणजे पोरखेळ असल्याचा टोला कायंदे यांनी शिंदे गटाला लगावलेला आहे. ईडी कारवाईच्या भीतीने तिकडे गेले आता हेवेदावे कशाला असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
तुमची ती नैसर्गिक युती अन् आम्ही केली अनैसर्गिक
एकनाथ शिंदेसह 40 आमदारांनी घेतलेल्या भूमिकेनंतर राज्याचे राजकारण बदलून गेले आहे. मात्र, आरोप-प्रत्यारोप हे सुरुच आहेत. तुम्ही केली ती नैसर्गिक युती आणि आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलेली युती ही अनैसर्गिक..हा कुठला अंदाज आहे, असे म्हणत कायंदे यांनी शिंदे-भाजपावरही टीका केली आहे. हे सर्व राज्यात घडत असले तरी करविता धनी कोण आहे असं म्हणत भाजपाच्या नेतृ्त्वावरही त्यांनी टीका केली आहे.