शेतकरी कुटुंब मारहाण प्रकरणी आमदार राजू पाटील आक्रमक; आपल्यापेक्षा बिहार भला, ठाकरे सरकारवर निशाणा

आंदोलन करुन सुद्धा गुन्हा दाखल होत नसेल तर आपल्यापेक्षा बिहार भला, अशी संतप्त प्रतिक्रिया राजू पाटील यांनी दिलीय. महिलांवर अत्याचार केला जातो, मारहाण केली जात आहे, तरीही एफआायआर दाखल होत नाही. आमचा समाज उठला तर घरातून बाहेर काढणार, हे आम्ही सहन करणार नाही असा इशाराच राजू पाटील यांनी दिला आहे.

शेतकरी कुटुंब मारहाण प्रकरणी आमदार राजू पाटील आक्रमक; आपल्यापेक्षा बिहार भला, ठाकरे सरकारवर निशाणा
राजू पाटील यांचे आंदोलन
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 9:02 PM

डोंबिवली : जमिनीसाठी शेतकरी कुटुंबाला (Farmer Family) बेदम मारहाण झाल्याची घटना कल्याण ग्रामीणमधील दहिसर मोकाशी पाडा येथे घडली आहे. या मारहाणीत शेतकरी पिता-पुत्र गंभीर जखमी झाले आहेत. तर महिलांसोबतही धक्काबुक्कीही करण्यात आली. शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे (Ramesh Mhatre) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणात डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन घेतला जात नसल्यामुळे मनसे आमदार राजू पाटील यांनी पोलिस अधिकाऱ्याच्या दालनात ठाण मांडले. यावेळी आंदोलन करुन सुद्धा गुन्हा दाखल होत नसेल तर आपल्यापेक्षा बिहार भला, अशी संतप्त प्रतिक्रिया राजू पाटील (Raju Patil) यांनी दिलीय. महिलांवर अत्याचार केला जातो, मारहाण केली जात आहे, तरीही एफआायआर दाखल होत नाही. आमचा समाज उठला तर घरातून बाहेर काढणार, हे आम्ही सहन करणार नाही असा इशाराच राजू पाटील यांनी दिला आहे.

285 एकर जमिनीवर बिल्डरांचा डोळा?

मारहाणीच्या घटनेला 22 तास उलटूनही डायगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. गुन्हा दाखल करण्यासाठी जवळपास 7 तास राजू पाटील यांनी पोलिस ठाण्यात होते. गुन्हा दाखल न झाल्याने संतापलेल्या मनसे आमदार राजू पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. कल्याण ग्रामीणमधील मोकाशी पाडा दहीसर मोरी या तीन गावांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांची 285 एकर शेती आहे. या शेतीवर विकास होणार आहे. या महत्वाच्या जागेवर सर्व बिल्डरांचा डोळा आहे. गुरुवारी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास काही जण हातात लाठ्या काठ्या घेऊन आले आणि मोकाशी पाड्यातील एकनाथ मोकाशी, त्यांच्या मुलगा प्रशांत मोकाशी यांना बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर महिलांनाही धक्काबुक्की करण्यात आली.

शेतकऱ्यांवरील अन्याय कदापी खपवून घेणार नाही- राजू पाटील

पिडीत कुटुंबाचा आरोप आहे की माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या सहकाऱ्यांनी हा हल्ला केला आहे. हल्लेखोरांचा एक व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. घटना कळताच कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी शेतकरी कुटुंबांना भेटण्यासाठी धाव घेतली. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल केला नसल्याने पाटील हे डायघर पोलिस स्टेशनला धाव घेतली. डायघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन गावडे यांची तब्य्येत अचानक बिघडल्याने पोलीस ठाण्यात अन्य अधिकाऱ्यांसोबत राजू पाटील यांनी चर्चा केली. आमदार पाटील हे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गावडे यांच्या दालनात जखमी शेतकऱ्यांना घेऊन बसले. शेतकरी कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. जे कोणी गुन्हेगार आहेत, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. शेतकऱ्यांवरील अन्याय कदापी खपवून घेणार नाही, असा इशाराच त्यांनी दिलाय. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याशिवाय इथून हालणार नाही अशी भूमिका पाटील यांनी घेतली होती.

इतर बातम्या :

ट्रॅफिकमुळेच 3 टक्के घटस्फोट होतात, हा जावईशोध कुठून लावला? विरोधकांच्या प्रश्नाला मिसेस फडणवीसांचं पुराव्यासह उत्तर

नितेश राणे प्रकृती बिघडली? रुग्णालयात ठेवलं जाण्याची शक्यता; तर प्रकृती अस्वास्थ्यावरुन वैभव नाईकांचा जोरदार टोला

‘पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी तुरुंगात जायला आणि मरायलाही तयार’, सोमय्यांच्या आरोपांना उत्तर देताना संजय राऊतांचं वक्तव्य

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.