AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravi Rana : आमदार रवी राणा यांचा आजचा मुक्काम तळोजा जेलमध्ये, आणखी किती अडचणी वाढणार?

रावी राणा यांची तळोजा रोड जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. तर नवनीत राणा यांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. मातोश्री आणि शिवसेनाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा आग्रह राणा कुटुंबाने धरला होता. त्यानंतर शिवसेनाही त्यांच्याविरोधात चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसून आले.

Ravi Rana : आमदार रवी राणा यांचा आजचा मुक्काम तळोजा जेलमध्ये, आणखी किती अडचणी वाढणार?
रवी राणा यांचा ब्लड प्रेशर वाढलाImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 25, 2022 | 12:28 AM
Share

मुंबई : शिवसेनेविरुद्ध (Shivsena) आक्रमक आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांची आज जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.  रावी राणा यांची तळोजा रोड जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. तर नवनीत राणा यांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. मातोश्री आणि शिवसेनाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा आग्रह राणा कुटुंबाने धरला होता. त्यानंतर शिवसेनाही त्यांच्याविरोधात चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसून आले. शिवसेनेकडूनही राणा कुटुंबियांच्या घरावर आक्रमक आंदोलन करण्यात आले. याच दरम्यान राणा कुटुंबियांनी राज्याचा आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान केला आसल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झाली आहे.

संघर्ष टोकाला पोहोचला

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवासांपासून हिंदूत्व आणि हनुमान चालीस या मुद्द्यावरून ठिणग्या उडत आहे. यावरून पुन्हा विरोधक आणि महाविकास आघाडी आमनेसामने आले आहेत. रवी राणा यांनीही सुरूवातीपासूनच शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवेसेनेने आपल्यावर अनेकदा खोटे गुन्हा दाखल करून आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रवी राणा यांच्याकडून वारंंवर करण्यात आलाय तर खासदार नवनीत राणा याही अनेकदा महाविकास आघाडी आणि ठाकरे सरकारवर हल्लाबोल चढवताना दिसून आलेत. आता राणा यांना अटक झाल्याने हा संघर्ष टोकाला पोहोचला आहे.

कारवाईवरूनही अनेक सवाल

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यावर झालेल्या कारवाईवरून भाजप नेत्यांकडून आणि राणा दाम्पत्याकडूनही जोरदार आरोप होत आहेत. शिवसेना ही गुंडगिरी पद्धतीने आमच्यावर हल्ले करत आहे. आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप हा राणा यांच्याकडून करण्यात येत आहे. तर शिवसेनेच्या काळात राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही, असे भाजप नेते म्हणत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर यावरून थेट राष्ट्रपती राजवटीची भाषा केली आहे. राणा यांना भेटण्यासाठी गेलेल्या किरीट सोमय्या यांच्यावरही हल्ला झाल्याने हे प्रकरण आणखी तापलं आहे. यावरूनच आता भाजप नेते उद्या दिल्लीत दाखल होत केंद्रीय गृह सचिवांकडे याबाबत तक्रारही करणार आहेत. त्यामुळे आगामी काळातही हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Manisha Kayande : मंगेशकर कुटुंबाने मनाचा कोतेपणा दाखवला, पत्रिकेत मुख्यमंत्र्यांचं नाव नसल्यावरून मनिषा कायंदेंचा निशाणा

Kirit Somaiya : राज्यातला वाद पुन्हा दिल्लीत पोहोचणार, सोमय्यांसह भाजप नेत्यांचं शिष्टमंडळ केंद्रीय गृह सचिवांना भेटणार

Sudhir Mungantiwar : आम्ही बॅक डोअर एन्ट्री करत नाही, राष्ट्रपती राजवटीच्या आरोपावर मुनगंटीवारांचं जोरदार प्रत्युत्तर

नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.