Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रभू राम यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य, जितेंद्र आव्हाड पक्षातही एकाकी

jitendra awhad | जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट चांगलाच आक्रमक झाला. त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर आंदोलन केले. त्यानंतर आपल्याच पक्षातील नेत्यांनीही त्यांना घरचा आहेर दिला आहे. वाद निर्माण करणारी वक्तव्य करु नका, असे बजावले आहे.

प्रभू राम यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य, जितेंद्र आव्हाड पक्षातही एकाकी
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 7:33 AM

मुंबई, दि. 4 जानेवारी 2024 | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. श्रीराम मांसाहारी होते, असे वक्तव्य शिर्डीत त्यांनी केल्यानंतर विरोधकांबरोबर स्वपक्षीयांकडूनही ते अडचणीत आले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यानंतर आमदार रोहित पवार यांनी त्यांनी घरचा आहेर दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट चांगलाच आक्रमक झाला. त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर आंदोलन केले. त्यावेळी शरद पवार गटाकडून विरोध झाला. परंतु आता आमदार रोहित पवार यांनी त्यांना विरोध केला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांनीही बुधवारी शाकाहारी आणि मांसाहारी असा भेद करण्याची गरज नाही, असे खडे बोल आव्हाड यांनी सुनावले होते.

काय म्हणाले रोहित पवार

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना घरचा आहेर दिला आहे. त्यांनी दिलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे.

हे सुद्धा वाचा

देव आणि धर्म व्यक्तीगत विषय

देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तीगत विषय आहे. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ… या राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचे भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे!

जितेंद्र आव्हाड यांना घरचा आहेर

रोहित पवार यांचे हे ट्विट म्हणजे जितेंद्र आव्हाड यांना घरचा आहेर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देवधर्मावर बोलणे टाळावे, असे म्हटले आहे.

'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला.
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया.