VIDEO : राष्ट्रवादी पुन्हा, बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांचा ठेका
राष्ट्रवादीचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत संदीप क्षीरसागर 'राष्ट्रवादी पुन्हा' या गाण्यावर (MLA Sandeep Kshirsagar dance video viral) थिरकताना दिसत आहेत.
बीड : राष्ट्रवादीचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत संदीप क्षीरसागर ‘राष्ट्रवादी पुन्हा’ या गाण्यावर (MLA Sandeep Kshirsagar dance video viral) थिरकताना दिसत आहेत. आमदार झाल्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यांच्या ताब्यातील पंचायत समितीवर वर्चस्व मिळवलं आहे. त्यामुळे सध्या बीड जिल्ह्यात संदीप क्षीरसागर (MLA Sandeep Kshirsagar dance video viral) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष सुरु आहे.
बीड पंचायत समितीवर वर्चस्व मिळवल्यामुळे संदीप क्षीरसागर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणूक काढली. या मिरवणुकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि संदीप क्षीरसागर यांनी ‘राष्ट्रवादी पुन्हा’ या गाण्यावर ठेका धरला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले होते. या पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना, शिवसंग्राम या दोन्ही पक्षांना राष्ट्रवादीच्या संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवारांचे तगडे आव्हान होते. अखेर संदीप क्षीरसागर यांनी या निवडणुीकत विजय मिळवला.
दरम्यान, बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत काका-पुतणे एकमेकांच्या विरोधात उभे राहिल होते. त्यामुळे येथील राजकारण चांगलेच तापले होते. मात्र विधानसभा निवडणुकीतही पुतण्या संदीप क्षीरसागरने विजय मिळवला.
VIDEO : राष्ट्रवादी पुन्हा, बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांचा ठेका pic.twitter.com/x3wLUUoiev
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 31, 2019