Sanjay Raut Ed Inquiry : “अटकेची प्रक्रिया मागच्या 6 महिन्यांपासून चालू होती, राऊतांचा अतिआत्मविश्वास नडला”, संजय शिरसाट यांचा निशाणा
Sanjay Shirsat : शिंदेगटातील आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय.
![Sanjay Raut Ed Inquiry : अटकेची प्रक्रिया मागच्या 6 महिन्यांपासून चालू होती, राऊतांचा अतिआत्मविश्वास नडला, संजय शिरसाट यांचा निशाणा Sanjay Raut Ed Inquiry : अटकेची प्रक्रिया मागच्या 6 महिन्यांपासून चालू होती, राऊतांचा अतिआत्मविश्वास नडला, संजय शिरसाट यांचा निशाणा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/08/01131838/MLA-Sanjay-Shirsat-Sanjay-Raut-Ed-Inquiry-and-arrested-at-Bhandup-Maitri-Bungalow-for-Patrachaal-scam-case.jpg?w=1280)
मुंबई : “संजय राऊतांना (Sanjay Raut Ed Inquiry) झालेल्या अटकेटी प्रक्रिया मागच्या सहा महिन्यापासून सुरू होती. चार वेळा नोटीस देण्यात आली. नोटीसला उत्तर न देणे , हजर न राहणं, त्यामुळे राऊत अडचणीत आले. कदाचित संजय राऊतला जास्त आत्मविश्वास होता की माझ्यावर काय होणार नाही परंतु ही अशी संस्था आहे की, पूर्ण कागपत्र घेतल्याशिवाय कुणावर कारवाई करत नाही. त्यांचा हा आत्मविश्वासच नडला अन् त्यांना अटक झाली असं शिंदेगटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी म्हटलंय. खासदार संजय राऊतांवर कारवाई झाली, त्यापेक्षा आम्हाला शिवसेना फोडणाऱ्या संजय राऊतांवर कारवाई झाली याचा आनंद थोडा अधिक आहे, असंही शिरसाटांनी म्हटलंय. संजय राऊतांची ईडी चौकशी आणि झालेली अटक या सगळ्यावरून शिरसाट यांनी निशाणा साधलाय.
“मला आश्चर्याचा धक्का यावर बसला की त्यांच्याकडे दहा-अकरा लाख रुपये सापडले आहेत आणि त्यावर एकनाथ शिंदेंचं नाव होतं. म्हणजे रामाचं मंदिर उभारण्यासाठी शिंदेसाहेबांनी दिलेले पैसे तेही या माणसाने घरी ठेवले काय की, जैसा करेगा वैसा भरेगा या उक्तीनुसार संजय राऊतांची वेळ आलेली आहे”,असंही शिरसाट म्हणालेत.
“तुम्ही दुसऱ्यांना नावं ठेवणं दुसऱ्यांची प्रेत यात्रा काढणं दुसऱ्यांना रेडे म्हणणं, महिला नेत्यांना वेष्या म्हणणं हा सर्व तळतळाट तुम्हाला लागला आहे. खासदार संजय राऊतांवर कारवाई झाली, त्यापेक्षा आम्हाला शिवसेना फोडणाऱ्या संजय राऊतांवर कारवाई झाली याचा आनंद थोडा अधिक आहे, असंही शिरसाटांनी म्हटलंय.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/08/01122255/cm-eknath-shinde-3.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/07/01032924/aslam-shaikh-1.jpeg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/07/01013332/Sanjay-Raut-and-Sunil-Raut.jpg)
संजय राऊत यांना जर वाटत असेल की पेढे वाटा तर खरंच ही पेढे वाटण्याची वेळ आहे. लोकांना युतीचं सरकार हवं होतं. पण पेढे वाटण्यासाठी उगाच ह्या माणसांवर पैसे खर्च करण्यात काहीही अर्थ नाही. आठ-आठ, नऊ-नऊ तास एकदा घरात ED चे लोक घरात गेले की याचा अर्थ असा आहे की, ते पूर्ण तयारीनिशी घरात जातात.आता जेलमध्ये जाऊन त्या दोन मंत्र्या सोबत पुन्हा युतीच्या गप्पा करेल की काय असं वाटतं. दोन मंत्री ऑलरेडीमध्ये आहेत हे तिसरे महाशय तिथं गेले आहेत .वाईट एका गोष्टीचं वाटतं की यांनी त्या मातोश्रीला फसवलं आणि उद्धव साहेबाला बाळासाहेबांना फसवलं तसंच शिवसैनिकांना फसवलं. शिवसैनिकांना मी विनंती करेन की, या माणसापासून सावध राहा. सगळ्यांची घर फोडली आहेत, त्या माणसाला माफ करू नका, असंही शिरसाटांनी म्हटलं.