अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण करा अन्यथा…., पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना 15 दिवसांचं अल्टिमेटम
आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना औंढा नागनाथ येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुतळ्याच्या अनावरणासंबंधी एक सविस्तर पत्र लिहिलं आहे. | Gopichand padalkar Letter To Cm Uddhav thackeray Over Ahilya Devi Holkar Statue
मुंबई : औंढा नागनाथ येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुतळ्याचं पुढच्या 15 दिवसांमध्ये अनावरण करा, अन्यथा समाजबांधवांच्या हस्ते आम्हीच अनावरण करु, असं आव्हान आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उ्दधव ठाकरे यांना दिलं आहे. पुढच्या 15 दिवसांचा अल्टीमेटम त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय. (MLC Gopichand padalkar Wrote A Letter To Cm Uddhav thackeray Over Ahilya Devi Holkar Statue)
औंढा नागनाथ येथील अहिल्याबाई होळकर यांचा पुतळ्याचं अनावरण खरं तर गेल्या वर्षी 16 फेब्रुवारीलाच होणार होतं. मात्र वर्ष उलटूनही या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं नाही. आता पुढच्या 15 दिवसांमध्ये पुतळ्याचं अनावरण झालं नाही तर समस्त समाज बांधवांच्या हस्ते होळकरांचे वंशज भुषणसिंह होळकरांच्या उपस्थितीत या पुतळ्याच अनावरण करणार असल्याचं पडळकर म्हणाले.
पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना औंढा नागनाथ येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुतळ्याच्या अनावरणासंबंधी एक सविस्तर पत्र लिहिलं आहे. या पत्रात पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम पुढच्या 15 दिवसांमध्ये करण्यात यावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. तसंच पत्राच्या सरतेशेवटी जर अनावरण कार्यक्रम झाला नाही तर समस्त समाज बांधवांच्या हस्ते होळकरांचे वंशज भुषणसिंह होळकरांच्या उपस्थितीत या पुतळ्याचं अनावरण करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
…तर हा अहिल्यादेवींचा अपमान, पडळकर आक्रमक
गोपीचंद पडळकर म्हणाले, गेल्या वर्षी 16 फेब्रुवारीलाच पुतळ्याचं अनावरण होणार होतं. मात्र वर्ष उलटूनही पुतळा लोकार्पणापासून वंचितच आहे. औंढा नागनाथ मंदिरांचा जिर्णोध्दार करणाऱ्या आहिल्यादेवींचाच पुतळा अजून पडद्यातच आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांचं कार्य राजकारणापलीकडचं आहे. त्यात किरकोळ श्रेयवादामुळे लोकार्पण थांबवणं हा पुण्यश्लोक आहिल्यादेवींचा अपमान ठरेल, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
(MLC Gopichand padalkar Wrote A Letter To Cm Uddhav thackeray Over Ahilya Devi Holkar Statue)
हे ही वाचा :
‘शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा’, पडळकरांचं राऊतांना पत्र
‘…तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असते’ शिवसेनेचा घणाघात
महाविकास आघाडी सरकार धनगरांचा तिरस्कार करतंय, पडळकरांचा गंभीर आरोप