मनसैनिक प्रवीण चौगुलेच्या आत्महत्येमागील तथ्य पोलिसांनी सांगितलं

पोलीस अतिरिक्त आयुक्त प्रवीण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार मनसे कार्यकर्ता प्रवीण चौगुलेने यापूर्वी 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

मनसैनिक प्रवीण चौगुलेच्या आत्महत्येमागील तथ्य पोलिसांनी सांगितलं
Follow us
| Updated on: Aug 21, 2019 | 3:27 PM

ठाणे :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांना ईडीने (ED) नोटीस पाठवल्याच्या कारणामुळे ठाण्यातील एका मनसे कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. प्रवीण चौगुले (Pravin Chowgule) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रवीणच्या (Pravin Chowgule) आत्महत्येनंतर पोलिसांनी त्याच्या पार्श्वभूमीचा तपशील दिला.

पोलीस अतिरिक्त आयुक्त प्रवीण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार मनसे कार्यकर्ता प्रवीण चौगुलेने यापूर्वी 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या वर्षीच मार्च आणि एप्रिल महिन्यात त्याने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता.

शिवाय प्रवीण चौगुले मानसिकरित्या कमकुवत होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. सध्या पोलिसांनी शांततेचं आवाहन करत, कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, असं बजावलं आहे.

प्रवीण चौगुलेचे यापूर्वीचे आत्महत्येचे प्रयत्न

  • 2015 मध्ये हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
  • मार्च 2019 मध्ये गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
  • एप्रिल 2019 मध्ये अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
  • 20 ऑगस्ट 2019 रोजी पेटवून घेऊन आत्महत्या, प्रवीणचं निधन

प्रवीणची आत्महत्या

प्रवीणने मंगळवारी 20 ऑगस्टला रात्री उशिरा पेटवून घेऊन आत्महत्या केली. प्रवीण हा ठाण्यातील विटावा भागात राहत होता. “राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आली आहे. त्यामुळे त्यांना चौकशीला सामोरे जावं लागणार आहे. यामुळे मी दु:खावलो असून आत्महत्या करतोय,” असं प्रवीणने त्याच्या मित्रांना आत्महत्येपूर्वी सांगितले होते. त्यानंतर त्याने स्वत:ला पेटवून घेतले.

एवढंच नव्हे तर काल दिवसभरात त्याने त्याच्या फेसबुकवर राज ठाकरेंच्या समर्थनात आणि ईडीच्या विरोधात अपशब्द वापरुन हजारो पोस्ट लिहिल्या आहेत.

प्रवीण हा ठाण्यातील कट्टर मनसैनिक होता. मनसेच्या अनेक कार्यक्रमात, मोर्चा किंवा आंदोलनात प्रवीण सहभागी असायचा. प्रत्येक मोर्चात प्रविण मनसेचा झेंडा त्याच्या शरीरावर रंगवायचा. तसेच स्थानिक नेत्यांच्याही तो फार जवळचा होता. त्याने फेसबुकवर मनसेच्या नेत्यांसोबत फोटो पोस्ट केले आहेत. त्याच्या आत्महत्येमुळे मनसैनिकांना फार मोठा धक्का बसला आहे.

संबंधित बातम्या 

राज ठाकरेंना ईडीची नोटीस, ठाण्यात मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या   

स्पेशल रिपोर्ट – किणी ते कोहिनूर : 23 वर्षात राज ठाकरेंची कोणकोणती चौकशी? 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.