सत्ताकाळात नाशिकमध्ये मनसेने काय काय केलं? अमित ठाकरे आज पाहणी करणार, आयुक्तांचीही भेट घेणार

अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. मनसेच्या सत्ताकाळात झालेल्या कामांची आज ते पाहणी करणार आहेत.

सत्ताकाळात नाशिकमध्ये मनसेने काय काय केलं? अमित ठाकरे आज पाहणी करणार, आयुक्तांचीही भेट घेणार
अमित ठाकरे आणि राज ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 29, 2021 | 8:44 AM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) नाशिक दौऱ्यावर (Nashik) आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. मनसेच्या सत्ताकाळात झालेल्या कामांची आज ते पाहणी करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे आणि नाशिकमधील मनसे पदाधिकारी असतील.

राज ठाकरेंचा पुण्यात तळ, अमित नाशिकच्या मैदानात

मनसेने महापालिका निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. मनसेला अनुकुल असलेल्या पुण्यात राज ठाकरे यांनी तळ ठोकलाय, तर काही वर्षे मनसेची सत्ता असलेल्या नाशकात राजपुत्र अमित ठाकरे मैदानात उतरले आहेत. आज अमित ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी कार्यकर्ते नेते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर आज ते मनसेच्या सत्ताकाळात झालेल्या प्रकल्पांना भेट देणार आहे.

मनसेच्या सत्ताकाळातल्या कामांना अमित ठाकरे भेट देणार

राज्यभरात चर्चेत असलेलं आणि मनसेने मोठ्या कष्टाने बनविलेल्या बोटॅनिकल गार्डनला अमित ठाकरे शुभेच्छा देणार आहेत. नाशिककरांनी मनसेच्या हाती सत्तेची चावी दिल्यानंतर शहरात मनसेने बोटॅनिकल गार्डन उभारुन राज्यातलं टॉप गार्डन उभारण्याचा मान मिळवला. दुसरीकडे मनसेने उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मारकाला देखील अमित ठाकरे भेट देणार आहेत.

अमित ठाकरे आयुक्तांची भेट घेणार

अमित ठाकरे आज महापालिका आयुक्त कैलास जाधव यांचीही भेट घेणार आहे. शहरातल्या काही महत्त्वांच्या विषयांवर ही भेट होणार असल्याची माहिती कळते आहे. अमित ठाकरे काही महत्त्वाचे विषय आयुक्त कैलास जाधव यांच्या कानावर घालू शकतात.

अमित ठाकरेंचा अॅक्टिव्हनेस वाढला!

गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे पक्षात चांगलेच अॅक्टिव्ह झाले आहेत. पक्षांतील नेते-कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन ते विविध विषय समजून घेत आहेत. त्यातच आता महापालिका निवडणुका असल्याने अमित यांचा अॅक्टिव्हनेस वाढलाय. त्यांनी काही दिवसांपूर्वीच नाशिक दौरा केला होता. त्यानंतर कालपासून पुन्हा त्यांनी नाशिकचा दौरा सुरु केलाय.

अमित ठाकरेंवर नाशिक महापालिका जबाबदारी

अमित ठाकरे यांच्या नाशकामधल्या फेऱ्या वाढल्या आहेत. त्यांनी नाशिक शहरात जातीने लक्ष घालायला सुरुवात केली आहे. नाशिक महापालिकेची निवडणूक तोंडावर असल्याने ते कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्या दृष्टीने तयारी करत आहेत. म्हणजेच अमित ठाकरेंवर नाशिक महापालिकेची जबाबदारी सोपविण्यात आली, अशी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

(MNS Amit Raj Thackeray Visit botanical Garden And baasaheb Thackeray Monument Nashik)

हे ही वाचा :

राज ठाकरे पुण्यात, अमित ठाकरे नाशिकमध्ये, महापालिका निवडणुकीसाठी बापलेकाने दंड थोपटले!

बॅग भरुन कपडे आणा, राज ठाकरेंचे मुंबईतील पदाधिकाऱ्यांना आदेश, ठाण्यावरुन आजच पुण्याला निघणार

पुण्यातून निघण्यापूर्वीच राज ठाकरेंचा पुढचा दौरा ठरला, 8 दिवसांनी ‘मी पुन्हा येईन’!

नाशिक, पुणेनंतर आता ठाणे महापालिकेसाठी मनसेची तयारी सुरु, सीकेपी हॉलमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक

'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.